Home पुणे Pune Fire: उरवडे कंपनी आग प्रकरणी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, मालक अटकेत | Pune

Pune Fire: उरवडे कंपनी आग प्रकरणी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, मालक अटकेत | Pune

0
Pune Fire: उरवडे कंपनी आग प्रकरणी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, मालक अटकेत | Pune

[ad_1]

Pune Fire: उरवडे आग प्रकरण; कंपनीचा मालक निकुंज शहाला अटक

Urawade Company Fire Mulshi Pune: पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील कंपनीला लागलेल्या आग प्रकरणात कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

पुणे, 8 जून: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात (Pune Mulshi Tehsil) असलेल्या उरवडे गावाजवळील केमिकल कंपनीला (Chemical Company Fire near Urawade) लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा मृत्यू (18 people died) झाला. या आग दुर्घटना प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी कंपनीचा मालक निकुंज शहा याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक (Company Owner Nikunj Shah arrest) केली आहे.

अहवालात काय म्हटलं आहे?

उरवडे आग दुर्घटना प्रकरणाचा चौकशी रिपोर्ट जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. बेकायदा अतिरिक्त ज्वलनशील पदार्थांचा साठा करणे, कर्मचाऱ्यांच्या ईएसआयएस अंतर्गत नोंदी नसणे, फायर सेफ्टी नियम अर्थात अग्निसुरक्षा शर्थींच उल्लंघन करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. यासोबतच 2016 ते 2020 प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय रासायनिक प्रक्रिया उद्योग चालवणे, पीएमआरडीएच्या परवानगी शिवाय कंपनीच्या मूळ बांधकामात बदल केल्याचंही म्हटलं आहे.

VIDEO: मुळशी दुर्घटनेनंतर प्रविण तरडेंचा संताप, “मुळशी तालुक्याची रग दाखवा, कंपन्यांत घुसून पाहणी करणार”

आगीत मृत्यू होण्याची कारणे

अहवालात म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांना स्वयंचलित दरवाजा स्फोटाच्या प्रेशरने बंद झाल्यानंतर बाहेर पडणं अशक्य झाल्याने कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला.

आगीत 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

उरवडे येथील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत एकूण 18 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. समोवारी (7 जून 2021) लागलेली ही आग अवघ्या काही क्षणातच झपाट्याने पसरली. या आगीत होरपळून मृत्यू झाल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण आहे त्यामुळे डीएनए टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 18 जणांपैकी 17 जणांची नावे समोर आली आहेत.


Published by:
Sunil Desale


First published:
June 8, 2021, 7:06 PM IST





[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here