Home पुणे Pune Fire : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, चौकशीनंतर जबाबदारी ठरेल-अजित पवार | Pune

Pune Fire : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, चौकशीनंतर जबाबदारी ठरेल-अजित पवार | Pune

0
Pune Fire : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, चौकशीनंतर जबाबदारी ठरेल-अजित पवार | Pune

[ad_1]

Pune Fire : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, चौकशीनंतर जबाबदारी ठरेल-अजित पवार

Pune Mulashi chemical factory fire – मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुंबई, 7 जून : पुण्याच्या मुळशी (Pune Mulashi) तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला (Chemical Company) लागलेल्या आगीत 17 कामगारांचा मृत्यू (17 workers death) झाला आहे. ही घटना दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

(वाचा-Pune : प्युरीफायरचे केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 17 कामगारांचा होरपळून अंत)

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेशही पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणं कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल असं अजित पवार म्हणाले.

(वाचा-पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू)

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तत्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भात अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तत्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे.

सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील, असंही अजित पवार म्हणाले. या कंपनीला लागलेल्या आगीत काम करणाऱ्या 37 पैकी तब्बल 17 कामगारांचा अंत झाला. यात महिला कामगारांची संख्या अधिक होती.


Published by:
News18 Desk


First published:
June 7, 2021, 10:05 PM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here