पुणे, 28 जून : राज्यात कोरोनाची (corona) तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहे. आजपासून पुण्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा (Delta variant of Coronavirus) आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने (Delta Plus variant of Coronavirus) सर्वांची चिंता वाढवली आहे. पुणे शहरात कोरोना प्रतिबंधित नियम पुन्हा कडक करण्यात आले आहे. पुणे शहराची लेव्हल 3 मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून एकाप्रकारे मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज सोमवारपासून शहरात 7 ते 4 वाजेपर्यंतच दुकानं सुरू राहणार आहे.