पुणे, 1 जुलै: पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीच्या शेजारी असलेल्या गावांचा मनपात समावेश करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीवर राज्य सरकारने निर्णय घेत 23 गावांचा पुणे मनपा हद्दीत (23 villages merger in PMC) समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. पण ही 23 गावे कोणती आहेत? काय आहेत या गावांची नावे? पाहूया या सर्वच्या सर्व गावांची नावे….
पुणे मनपा हद्दीत समावेश झालेल्या गावांची नावे (List of 23 villages merge in PMC)
अनुक्रमांक | गावाचे नाव | गावाची हद्द |
1 | म्हाळुंगे | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
2 | सूस | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
3 | बावधन बुद्रुक | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
4 | किरकिटवाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
5 | पिसोळी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
6 | कोंढवे-धावडे | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
7 | कोपरे | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
8 | नांदेड | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
9 | ख़डकवासला | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
10 | मांजरी बुद्रुक | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
11 | नऱ्हे | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
12 | होळकरवाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
13 | औताडे-हांडेवाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
14 | वडाची वाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
15 | शेवाळेवाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
16 | नांदोशी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
17 | सणसनगर | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
18 | मांगडेवाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
19 | भिलारेवाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
20 | गुजर निंबाळकरवाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
21 | जांभुळवाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
22 | कोळेवाडी | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
23 | वाघोली | संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र |
ग्रामस्थांकडून निर्णयाचे स्वागत
पुणे महानगरपालिका क्षेत्रात 23 गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार आता याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही आता चालू होणार आहे. या निर्णयावर कृती समितीने स्वागत करत म्हटलं, हा निर्णय नक्कीच अभिनंदनीय असून समाविष्ट 23 गावातील विकासकामांचा मार्ग मोकळा झालेला आहे. याठिकाणी नियोजनबध्द विकास होणे शक्य होणार आहे. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचावणार असून शहरीकरणाचा वेग वाढणार आहे. पुणे शहर हे आता खऱ्या अर्थाने देशातील सर्वात मोठे शहर झाले आहे.
या 23 गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करावा अन्यथा स्वतंत्र महानगरपालिका तयार करावी अशी मागणी ग्रामस्था आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वारंवार होत होती. तर राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते प्रवीण तुपे यांनी हडपसर मनपा निर्मितीची मागणी केली होती. पण अखेर आज राज्य शासनाकडून या 23 गावांचा समावेश पुणे मनपात करण्याच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.