Home पुणे पुणे, नाशिक अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात, जाणूण घ्या नियमावली काय सुरू काय बंद | Nashik

पुणे, नाशिक अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात, जाणूण घ्या नियमावली काय सुरू काय बंद | Nashik

0
पुणे, नाशिक अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात, जाणूण घ्या नियमावली काय सुरू काय बंद | Nashik

[ad_1]

पुणे (वृत्तसंस्था) | शासननामा न्यूज ऑनलाईन

कोरोनाची दुसरी लाट आता महाराष्ट्रातून ओसरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पॉझिटिव्हीटी रेटच्यानुसार वर्गीकरण करून निर्बंध घालण्यात आले आहेत. या वर्गीकरणात पुणे आणि नाशिक तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. राज्यशासनाच्या अनलॉकच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे आणि नाशिक शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होत आहे.

नाशिकमध्ये काय सुरू काय बंद –

– सर्व दुकाने, आस्थापना 4 वाजेपर्यँत सुरू राहणार

– शनिवार, रविवार पूर्णतः बंद ठेवण्याबाबत विचार

– सोमवारपासून नवीन नियमावली लागू होणार

– मॉल्स, थेटर्स, नाट्यगृह बंद राहणार

– हॉटेल 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील, नंतर पार्सल सेवा सुरू होणार

– ओपन गार्डन, जॉगिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 पर्यंत सुरू राहणार

– गव्हर्नमेंट ऑफिसेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

– लग्न 50 लोक, अंत्यविधी 20 लोक, तसेच मीटिंग 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

– बांधकाम 4 वाजेपर्यंत सुरू राहील

– नाशिक जिल्ह्यात रात्री 12 ते दुपारी 5 पर्यंत जमावबंदी लागू असेल, त्यानंतर 5 ते रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू असेल

पुण्यातील नियम असे

-हॉटेल, रेस्टोरंट – ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने, शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा

-लोकल – फक्त अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी

-सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत

-खासगी कार्यालये – ( सोमवार ते शनिवार )  दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता)

-सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम – 50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत

-लग्न समारंभ – 50 जणांच्या उपस्थितीत, अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत, शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती

-बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा, शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत

-संचारबंदी – शहरात सायंकाळी पाचनंतर ,जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्वीच्या वेळात

-सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून

पुढील आठवड्यात निर्बंध हटण्याची शक्यता

मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा नियंत्रणात आला असून त्यामध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. हा कल कायम राहिल्यास पुढील आठवड्यापर्यंत पुण्यातील कोरोना निर्बंध जवळपास हटण्याची शक्यता आहे. कारण पुढील आठवड्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 5 टक्क्यांपर्यंत येईल. त्यामुळे शासनाच्या नियमावलीनुसार जवळपास सर्व निर्बंध हटू शकतात.

पुण्यातील आजची स्थिती

दरम्यान, आज पुण्यामध्ये नवीन 297 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 25 रुग्णांचा आज मृत्यू झाला त्यातील पुणे शहरातील 16 रुग्णांचा समावेश आणि पुण्याबाहेरील 9 रुग्ण आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची आजची संख्या 549 एवढी आहे. आजमितीला शहरात असलेले 4295 सक्रिय रुग्ण आहेत. आज एकूण 5868 चाचण्या  करण्यात आल्या.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here