Home क्रीडा Pune News : पुण्याचा ऋतुराज गायकवाड झळकला पूर्ण भारतावर

Pune News : पुण्याचा ऋतुराज गायकवाड झळकला पूर्ण भारतावर

0
Pune News : पुण्याचा ऋतुराज गायकवाड झळकला पूर्ण भारतावर

 (दिनांक 31 मार्च)  झालेल्या (Pune News) आयपीएल सामन्यामध्ये, गुजरात मे चेन्नईला पाच बळी राखून हरवले. चेन्नई कडून मोईन आली, अंबाती रायडू, शिवम दुबे यांच्या फलंदाजीच्या थोड्या मदतीने चेन्नईने 178 पर्यंत स्वतःची धाव संख्या नेली. परंतु ऋतुराज गायकवाडच्या खेळीमुळे हे शक्य झाले. ऋतुराज गायकवाड ने 50 चेंडूंमध्ये 92 धावा काढल्या. ऋतुराज ने 2023 आयपीएल चा पहिला षटकार आणि पहिला चौकार ही मारला आहे. 

पोस्टमॅच प्रेस कॉन्फरन्स मध्ये गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ऋतुराज बाबतीत भरभरून कौतुक करत होता. तो म्हणाला, ” मॅच च्या एका वेळी तर चेन्नई निवांत 230 ते 240 च्या धावसंख्ये पर्यंत पोहोचेल असे वाटत होते. ऋतुराज ला कोणत्या ठिकाणी गोलंदाजी टाकावी याची कल्पनाच येत नव्हती. मला मनापासून वाटले की आज आपण त्याला अजिबात बाद करू शकणार नाही. त्याने मारलेले काही फटके हे भरपूर चांगल्या गोलंदाजीला मारलेले होते. मी कर्णधार असल्याबरोबरच गोलंदाजही आहे यामुळे माझे काम अजून अवघड झाले. ऋतुराज जर असेच खेळत राहिला तर भारतीय संघामध्येही तो उत्तम कामगिरी करू शकेल.”
2023 च्या आयपीएल ची सुरुवात ऋतुराज कडून एकदम चांगली झाली आहे. मागच्या वर्षीच्या आयपीएल मध्ये ऋतुराज काही एवढा चालला नव्हता. परंतु त्याआधी 2021 च्या आयपीएल मध्ये ऋतुराज गायकवाडला पूर्ण आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा असण्यासाठी ‘ऑरेंज कॅप’ मिळाली होती. यंदाच्या आयपीएल मध्ये शुभमन गिल, के एल राहुल, विराट कोहली यांच्याबरोबरच ऋतुराज चे हे नाव ऑरेंज कॅप च्या स्पर्धेमध्ये जोडले जात आहे. ऋतुराज हा मोर्चा पुणे जिल्ह्याचा असतो पुणे येथील वेरॉक अकॅडमी मध्ये त्याने स्वतःचे प्रशिक्षण घेतले होते. मग पुण्याचा हा प्रतिभावान खेळाडू भारतीय क्रिकेट संघामध्ये कधी स्वतःला सिद्ध करतो हे (Pune News)  बघायला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here