Home पुणे Pune Police Tweet: गँग्स ऑफ वासेपुरमधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरुन पुणे पोलिसांचं भन्नाट TWEET | Pune

Pune Police Tweet: गँग्स ऑफ वासेपुरमधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरुन पुणे पोलिसांचं भन्नाट TWEET | Pune

0
Pune Police Tweet: गँग्स ऑफ वासेपुरमधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरुन पुणे पोलिसांचं भन्नाट TWEET | Pune

[ad_1]

गँग्स ऑफ वासेपुरमधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरुन पुणे पोलिसांचं भन्नाट TWEET

Pune Police Tweet: पुणे पोलिसांनी केलेलं एक ट्वीट सध्या तुफान व्हायरल होत आहे. जनजागृती करण्यासाठी या सिनेमातील डॉयलॉगच्या मिम्सचा वापर केलाय.

पुणे, 05 जुलै: पुणे पोलिसांनी (Pune Police) केलेलं एक ट्वीट (tweet) सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनुराग कश्यपचा सिनेमा गँग्स ऑफ वासेपुर (Gangs of Wasseypur) सिनेमातील एका डायलॉगचा आधार घेऊन हे ट्विट केलं आहे. पुणे शहर पोलिसांनी जनजागृती (Awareness) करण्यासाठी या सिनेमातील डॉयलॉगच्या मिम्सचा वापर केलाय.

2012 मध्ये रिलीज झालेला गँग्स ऑफ वासेपुरमधील एका सीनवर अतिशय लोकप्रिय असे मिम्स आहेत. याचाच आधार घेऊन पुणे शहर पोलिसांनी ऑनलाईन घोटाळ्याबाबत जनजागृती करणारं ट्विट केलं आहे.

सिनेमातील प्रसिद्ध डॉयलॉग “Chaabi kahan hai?” (चावी कुठे आहे?) असं ट्विट करत पोलिसांनी एक प्रकाराचा इशारा दिला आहे. स्वस्त किंमतीत दुचाकी वाहनांसारख्या वस्तू विकणार्‍या काही विशिष्ट वेबसाइटवर असत्यापित यादीमध्ये न पडण्याचा इशारा पोलिसांनी या ट्विटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

फसवणूक करणाऱ्यांविरूद्ध जनजागृती करण्याच्या मोहिमेत पोलिसांनी नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटमध्ये पोलिसांनी लिहिलं की, #Cyber Victim to #Fraudster after paying advance for a Scooty listed on OLX/Quikr at ‘Half the Price’ ‍♀️

जर बनायचं असेल ऑनलाईन सौद्यांचा “सरदार”… तर OLX/Quikr विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळून करा व्यवहार!

सध्या ऑनलाईन वाहन खरेदी घोटाळा बराच सुरु आहे. ऑनलाईन वाहन खरेदी केल्यानंतर कागदपत्रमध्ये बरेच त्रुटी असतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी जनजागृती करण्याचं ठरवलं. ऑनलाईन गाडीचा व्यवहार करताना विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळूनच व्यवहार करा, असं सांगत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.


Published by:
Pooja Vichare


First published:
July 5, 2021, 12:35 PM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here