Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मनपाने काढला नवा आदेश | Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मनपाने काढला नवा आदेश | Pune

0
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मनपाने काढला नवा आदेश | Pune

पुणे, 18 जून: पुणे शहरात (Pune City) कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोविड (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध आणखी शिथिल होतील अशी अपेक्षा पुणेकरांना होती. मात्र, आज पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) नव्याने काढलेल्या आदेशात पुणेकरांना वाढीव दिलासा मिळालेला दिसत नाहीये. पाहूयात काय म्हटलं आहे नव्या आदेशात.

शनिवार – रविवार इतर दुकाने, हॉटेल्स, मॉल्स ब्युटी पार्लर, स्पा खुली राहतील ही पुणेकरांची अपेक्षा फोल ठरल्याचं दिसत आहे. यासोबतच नाट्यगृहे, चित्रपटगृह सुरू करण्याबाबत सुधारित आदेशात उल्लेख नाहीये. त्यामुळे पुणेकरांची काहीशी निराशा झाली आहे.

काय सुरू काय बंद?

पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोविड-10 च्या संसर्गास प्रतिबंधित करण्यासाठी 5 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार.

पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-10च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी दिनांक 11 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवांमधील नमूद दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, शनिवार आणि रविवार बंद राहणार.

रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा/घरपोच सेवेसाठी रात्री 11 पर्यंत सुरू राहणार आहेत.

कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहतील.

पुण्यातील कोरोनाची स्थिती काय?

आज नव्याने बाधित रुग्णांची नोंद – 280

आजच्या करण्यात आलेल्या चाचण्या – 5951

कोरोनामुळे आज झालेले मृत्यू – 19

19 मृतकांपैकी 7 पुण्यातील तर 12 पुण्याच्या बाहेरील

आज डिस्चार्ज झालेल्यांची संख्या – 318

पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या – 2658

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here