Sharad Pawar: शरद पवारांच्या एका नातवाने केला दुसऱ्या नातवाचा पराभव

0
33

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीत बाजी मारली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शदर पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर पवार घराण्यातील दुसऱ्या व्यक्तीची क्रिकेटच्या मैदानावर एंट्री झाली. मात्र, या निवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता.

कारण ज्येष्ट नेते शरद पवार यांच्या दोन नातवांमध्येच ही निवडणुक रंगली. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. रोहित पवार आणि अभिषेक बोके हे या निवडणुकीत आमने-सामने आले होते. त्यामध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये या संघटनेचे अध्यक्षपदही रोहित पवार यांनी मिळाले.

रविवारी एमसीएची निवडणूक गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या स्टेडियममध्येवर पार पडली. महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख जे. एस. सहारिया यांच्या देखरेखीखाली निवडणूक जाहीर झाली. तेव्हापासून या निवडणुकीची कधी नव्हे ती चर्चा रंगली होती. कारण मुंबई क्रिकेट असोसिऐशनच्या निवडणुकीमध्ये राजकारणी विरुद्ध क्रिकेट पट्टू असा सामना झाला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची जोरदार चर्चा सुरू होती.

या निवडणुकीत संलग्न क्लबमधून आमदार रोहित पवार आणि अभिषेक बोके (पवार यांच्या भगिनीचे नातू) यांच्याबरोबरच माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर व सुनील संपतलाल मुथा यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिऐशनच्या कार्यकारीनीसाठी अर्ज भरले होते. त्यामध्ये रोहित पवार आणि बोके हे समोरासमोर होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

रोहित पवार कोणत्याही परिस्थितीत ही संघटना ताब्यात घेण्यासाठी आग्रही होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यासाठी बैठक घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, अभिषेक बोके यांनी माघार घेतली नाही, त्यामुळे शेवटी रविवारी मतदान झाले. आणि निकालही जाहीर झाला.

त्यामध्ये रोहित पवार यांनी ‘मुथा यांना क्लब’ वर्गातून सर्वाधिक मते मिळवित विजय मिळविला. एकूण चोवीस मतांपैकी पवार यांना २२, तर मुथा यांना २१ मते पडली. बोके यांना अवघ्या तीन मतावर समाधान मानावे लागले. तर सुगवेकर यांना दोन मते मिळाली. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांनी बिनविरोध बाजी मारली. त्यामुळे आता क्रिकेटच्या मैदानावर त्यांची नवी इनिंग सुरु झाली आहे.

अध्यक्ष – रोहित पवार (स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब, पुणे)

उपाध्यक्ष – किरण सामंत (रत्नागिरी)

सचिव – शुभेंद्र भांडारकर (आजीवन सदस्य, पुणे)

सहसचिव – संतोष बोबडे (परभणी)

कोषाध्यक्ष – संजय बजाज (सांगली)