
पुणे, 18 जून: मंगळवारी पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ एका सहा वर्षाच्या मुलाचा सासवड परिसरात एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला (Son and mother dead body found) होता. संबंधित मायलेकराची हत्या (Murder) केल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालं होतं. पण सहलीला गेलेल्या या पुण्यातील कुटुंबीयांसोबत नेमकं काय घडलं याचं गूढ बनलं होतं. पण भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केल्यानंतर महत्त्वाचा खुलासा केला आहे. संबंधित मायलेकराची हत्या मुलाच्या आजारपणातून झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बेपत्ता वडिलांवर हत्येचा संशय असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
आलिया आबिद शेख (वय 35) व त्यांचा मुलगा आयान आबिद शेख (वय 6) अशी हत्या झालेल्या मायलेकराची नावं आहेत. ते पुण्यातील धानोरी परिसरात वास्तव्याला होते. खून केल्यानंतर आरोपीनं आयानचा मृतदेह कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ तर आलिया शेख यांचा मृतदेह सासवड-जेजुरी रस्ताच्या कडेला टाकला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यापासून आयानचे वडील आबिद शेख बेपत्ता आहेत. त्यामुळे पोलिसांना आबिद यांच्यावर हत्येचा संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ते 14 जून रोजी आबिद आापल्या कुटुंबाला सहलीला घेऊन गेला होता. त्यानं 14 जून रोजी आपल्या कुटुंबीयाला सासवड, दिवेघाट, बनेश्वर, बोपदेव घाट, दिवेघाटातून सासवडला नेलं होतं. याठिकाणीच त्यानं आलियाचा खून केला असावा आणि त्यानंतर मुलाची गळा आवळून हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. खरंतर, हत्येच्या रात्री संशयित आरोपी आबिद हे मध्यरात्री एक वाजता मार्केट यार्ड परिसरात भाड्यानं घेतलेली कार लावून स्वारगेटच्या दिशेनं पायी गेल्याचं सीसीटीव्ही
मुलाच्या आजारपणातून झाली हत्या?
आबिद आणि मृत आलिया हे दाम्पत्य मुळचे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. प्रेमविवाह केल्यानंतर 2007 पासून ते नोकरीच्या निमित्तानं पुण्यात वास्तव्याला आले होते. दोघंही उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील होते. आबिद शेख हा एका कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होता. तर आलिया एका वित्तपुरवठा कंपनीमध्ये नोकरी करीत होत्या. त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आयान हा स्वमग्न (ऑटीझम) या आजारानं ग्रस्त होता. त्यामुळे आलिया यांनी नोकरी सोडून मुलाच्या संगोपनावर लक्ष्य केंद्रीत केलं होतं.