लोणावळा, 13 जून: कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) नियमांत शिथिलता आणत व्यवहार, सेवा सुरू करण्यास काही प्रमाणात परवानगी दिली. मात्र, अद्यापही पूर्णपणे निर्बंध उठवण्यात आलेले नाहीयेत. पर्यटनस्थळांवरही बंदी (Tourist spot closed) घालण्यात आली आहे. पण तरीही नागरिकांनी राज्यातील विविध पर्यटनस्थळांवर तोबा गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे सुद्धा वाहू लागले (waterfall) आहेत. याच धबधब्यांवर आता पर्यटकांनी नियमांचं उल्लंघन करत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन स्थळांवर बंदी असतानाही नागरिक धबधब्यांवर गर्दी करत आहेत. नागरिकांची ही गर्दी म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ठरणार असे दिसत आहे.