Home पुणे Union Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक राजकीय नेत्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे | National

Union Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक राजकीय नेत्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे | National

0

[ad_1]

नवी दिल्ली, 7 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) करण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात तब्बल 43 नेते मंत्रिपदाची शपथ (43 leaders to take oath) घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यापूर्वी अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Many ministers resign) दिला आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) आणखी एका दिग्गज मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळातून एकूण 12 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

एकूण 12 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामध्ये प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), रवी शंकर प्रसाद यांच्या नावाचा समावेश आहे. दुपारपर्यंत महाराष्ट्रातून संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, रावसाहेब दानवे यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.

एकूण 12 मंत्र्यांचा राजीनामा

प्रकाश जावडेकर

रवी शंकर प्रसाद

संतोष गंगवार

रमेश पोखरियाल निशांक

देबश्री चौधरी

प्रताप चंद्र सारंगी

बाबूल सुप्रियो

डॉ हर्षवर्धन

थावरचंद गेहलोत

रतन लाल कटारिया

संजय धोत्रे

मोदींच्या मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशचे प्राबल्य

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधात नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला झुकते माप दिले आहे. जातीय समतोल राखत नवीन चेहर्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. राज्यात 8 मंत्रिपद देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पाठोपाठ गुजरात 6, महाराष्ट्र 4, पश्चिम बंगाल 4, बिहार आणि कर्नाटक प्रत्येकी 3, ओडिशा आणि मध्यप्रदेश प्रत्येकी 2 तर, आसाम, हिमाचल प्रदेश, झारखंड, मणिपूर, नवी दिल्ली, राजस्थान, तेलंगणा, तामिळनाडू, त्रिपुरा तसेच उत्तराखंड मध्ये प्रत्येकी 1 मंत्रीपद देण्यात आले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here