[ad_1]
Crime in Pimpari-Chinchawad: दोन दिवसांपूर्वी दोन तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत हातात कोयता घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण मारहाण (Accused beat citizens with scythe) केली होती.
पिंपरी चिंचवड, 06 जुलै: दोन दिवसांपूर्वी पिंपळे निलख परिसरात दोन तरुणांनी दारू पिऊन रस्त्यावर जबरदस्त राडा घातला होता. हातात कोयता घेऊन त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण मारहाण (Accused beat citizens with scythe) केली होती. दरम्यान येथील एका नागरिकानं या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक (Both arrested) केली आहे. तसेच या गावगुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आरोपींना त्याच रस्त्यावरून नेऊन त्यांची धिंड काढली आहे. या दोन्ही घटनांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
प्रतीक खरात आणि चेतन जावरे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोपींनी दारू पिऊन पिंपळे निलखच्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण मारहाण केली होती. हातात कोयता घेऊन त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली होती. सोमवारी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक करून दोघांची त्याच रस्त्यावर नेऊन धिंड काढली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना हातात कोयता घेऊन मारहाण करणाऱ्या गावगुंडांची पोलिसांनी धिंड काढली, घटनास्थळ पाहण्यासाठी गेल्याचा सांगवी पोलिसांचा दावा pic.twitter.com/hrQiU19rR2
— Anish Bendre (@BendreAnish) July 6, 2021
मात्र याबाबत सांगवी पोलिसांना विचारलं असता, आरोपींना घेऊन घटनास्थळ पाहण्यासाठी गेल्याचा दावा केला आहे. दरम्यान कुणीतरी घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे गावगुडांची धिंड काढली की केवळ घटनास्थळाची पहाणी केली, याबाबत संभ्रम तयार झाला आहे.
पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना हातात कोयता घेऊन गाव गुंडाची मारहाण pic.twitter.com/WGngNqFlAR
— Anish Bendre (@BendreAnish) July 6, 2021
हेही वाचा-नातं हरलं! माशावरुन झालेला वाद टोकाला; भाच्यानं मामासोबत केलं निर्दयी कृत्य
नेमकं काय घडलं त्यादिवशी?
पिंपरी चिंचवड परिसरातील पिंपळे निलख भागात दोन मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास नागरिकांच्या गाड्या अडवून त्यांच्यावर विनाकारण हल्ला केला होता. प्रतीक संतोष खरात आणि चेतन जावरे अशी हल्लेखोर तरुणांची नावं आहेत. दोघांतील एका तरुणाच्या हातात कोयता होता. त्यांनी कोयत्यानं काही नागरिकांच्या वाहनावर हल्ला केल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन्ही आरोपींना सध्या ताब्यात घेतलं असून न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
[ad_2]
Source link