लोणावळा, 27 जून: ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द झाल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या आणि राजकीय आरक्षणाच्या संदर्भात लोणावळ्यात (Lonavala) ओबीसी महासंघाने ओबीसी परिषद (OBC council) भरवली होती. या परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी सहभाग घेतला. या ओबीसी परिषदेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाषणा दरम्यान केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
वडेट्टीवारांना धमकावणारे कोण?
विजय वडेट्टीवार म्हणाले, सर्वपक्षीय नेत्यांनी एकवटलं पाहिजे आणि संघर्षासाठी रस्त्यावर उतराला हवे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी बोलतो, समाजाच्या बाजू मांडतो मात्र मला दररोज धमक्यांचे फोन येत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून धमकी देणारे कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.