Home पुणे Pune Crime: प्रियकरासाठी तरुणीने मोडला संसार; झोपेच्या गोळ्या देऊन इंजिनिअर पतीचा काढला काटा | Crime

Pune Crime: प्रियकरासाठी तरुणीने मोडला संसार; झोपेच्या गोळ्या देऊन इंजिनिअर पतीचा काढला काटा | Crime

0
Pune Crime: प्रियकरासाठी तरुणीने मोडला संसार; झोपेच्या गोळ्या देऊन इंजिनिअर पतीचा काढला काटा | Crime

पुणे (वृत्तसंस्था) | शासननामा न्यूज ऑनलाईन

विवाहबाह्य संबंधात (Extra Marital Affair) अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या (Wife killed husband with the help of lover) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेच्या गोळ्यांचा (Sleeping pills) ओव्हरडोस दिला आहे. यानंतर पत्नीने आपल्या पतीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंदही केली होती. पण पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकल्याने हत्येचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

मनोहर हांडे (वय-27) असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी अश्विनी मनोहर हांडे (वय-19) आणि प्रियकर गौरव मंगेश सुतार या दोघांना अटक केली आहे. अश्विनी आणि गौरव दोघं एकमेकांना मागील बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. गौरव हा अश्विनीचा सातवीपासूनचा प्रियकर आहे. ते दोघंही बारावी पर्यंत एकत्र शिकले आहेत. दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये अश्विनीच्या घरच्यांनी तिचं लग्न मामाचा मुलगा मनोहर याच्याशी लावून दिलं. पण लग्न झाल्यानंतरही अश्विनीने गौरवसोबत आपले प्रेमसंबंध सुरूच ठेवले.

दरम्यानच्या काळात गौरवसोबत प्रेमसंबंध असल्यावरून पती पत्नीमध्ये कडाक्याची भांडणंही झाली होती. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा कसा काढायचा याचा विचार सुरू असतानाच, मृत पती मनोहरला 15 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे मनोहर घरीच क्वारंटाइन होऊन उपचार घेतं होता. या चालुन आलेल्या संधीचा फायदा पत्नी अश्विनीने घेतला. तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने चहातून झोपेच्या गोळ्या दिल्या. पण तरीही पतीचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे तिने पुन्हा एकदा दूधातून झोपेच्या गोळ्याचा ओव्हरडोस दिला.

पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, शुद्ध हररलेल्या करण्यासाठी पत्नीने प्रियकरला घरी बोलावून घेतलं. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची तोंड दाबून हत्या केली. आणि कोरोनामुळे निधन झाल्याचं भासवलं. सुरुवातील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची करून घेतली होती. पण सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर आणि पोलिस शिपाई दिगंबर साळुंखे यांना मनोहरच्या मृत्यूबाबत साशंकता निर्माण झाली. याप्रकरणी पोलिसांनी आसपासच्या लोकांची विचारपूस केल्यानंतर, मनोहर नोकरीला गेल्यावर एक तरुण नेहमी घरी येतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोबाइल लोकेशन आणि मेसेजच्या आधारे पुरावे गोळा करून दोघांना अटक केली. पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here