पुणे, 21 जून : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (shiv sena mla pratap sarnaik letter) यांनी ‘भाजपसोबत युती करावी’ अशी मागणीच पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आणि शिवसेना (Shivsena) युतीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ‘भविष्यात युती होऊ शकते, त्याचा आम्हाला आनंद होईल’ असं सूचक विधान भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी केलं आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना गिरीश बापट यांनी प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर आपली भूमिका मांडली आहे.
शिवसेना आणि भाजप गेल्या 25 वर्षांपासून एकत्र होते. नंतर अनैसर्गिक लोकांमुळे आमची तुटली होती. त्यामुळे भविष्यात युती होऊ शकते. जर युती झाली तर आम्हाला त्याचा आनंद होईल. प्रताप सरनाईक आत्ता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होत असतांना बोलत होते. त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यायचाय, असं आवाहनच बापट यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.