मदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत

0
81

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

26 जुलै महाराष्ट्रवर अस्मान सुलतानी बरसली त्यात अवघा महाराष्ट्र जलमय झाला होता या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाने केलेल्या आपत्ती व्यवस्थापन पुरते तीन तेरा वाजले.

महाड-चिपळूण-सांगली-कोल्हापूर परिसरातील भीषण महापुराने हजारो कुटुंबे उद्‌वस्त झाली संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेल्या. जनावरे मरण पावली काही वाहून गेली सद्या महाड चिपळूण कोल्हापूर सांगली मद्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमुळे अस्वस्थ झालेल्या अनेकांनी तेथे मदतकार्यासाठी धाव घेतली. आपत्तीग्रस्त भागात कामाचा पूर्वानुभव असलेल्या पुण्यातील ‘राज देशमुख मित्र परिवार’ या तरुणांच्या गटातील सदस्यही तातडीने महाड मधील पूरग्रस्त भागात दाखल झाले. जनसंवाद करताना परिस्थितीचा अंदाज घेऊन राज देशमुख यांनी अजून 3 ट्रक भरून जीवनावश्यक वस्तूंची मदत जमा केली.

हे विश्वची माझे घर या उक्ती प्रमाणे राज देशमुख यांचे कार्य चालू आहे महाड वासियांसाठी.

पूरग्रस्त महाड परिसरातील राजेवाडी, कोंडीवली, अकले, टेमघर, बिरवाडी, काळीज, आदिवासी वाडी, खरवली, बुद्धवस्ती अशा अनेक गावात जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे, कपड्यांचे आणि किराण्याचे वाटप केले. यावेळी ग्रामस्थांच्या मदत घेते वेळी ग्रामस्थांचे अश्रू अनावर झाले. स्थानिक प्रशासनाच्याच्या ही आधी आपली मदत आमच्या कडे पोहचली आम्ही जन्मभर ऋणी राहू असे आभार राज देशमुख यांचे ग्रामस्थांनी मांडले. या प्रसंगी खा. संभाजीराजे छत्रपती, वि पुणेकर व जागृती ग्रुप चे सौंस्थापक राज देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेशजी पांडे, उरुळीकांचण चे सरपंच मयूर कांचन, सचिन कदम, डॉ. ऋतुराज पाटील, स्वप्निल पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.