Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रRajesh Tope: Elephantiasis Eradication: हत्तीरोग निर्मूलन: राज्यातील 'या' सहा जिल्ह्यामध्ये राबवणार मोहीम...

Rajesh Tope: Elephantiasis Eradication: हत्तीरोग निर्मूलन: राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यामध्ये राबवणार मोहीम – elephantiasis eradication campaign to be implemented in six districts of the state


हायलाइट्स:

  • महाराष्ट्रातून हत्तीरोग निर्मूलनासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे- आरोग्यमंत्री राजेश टोपे.
  • राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी १५ जुलैपर्यंत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पंधरवडा
  • चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये राबवणार मोहीम.

मुंबई: राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पंधरवडा १५ जुलै पर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाला. महाराष्ट्रातून हत्तीरोग निर्मूलनासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. (elephantiasis eradication campaign to be implemented in six districts of the state)

राज्यातील १८ जिल्हे हत्तीरोग प्रवण जिल्हे म्हणून ओळखले जायचे. त्यापैकी जळगाव, सिंधुदुर्ग, लातूर, अकोला, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती, ठाणे, पालघर, नागपूर आणि वर्धा या बारा जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वीपणे राबविल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आता ही मोहिम बंद करण्यात आली आहे. सध्या उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये ही मोहीम आजपासून १५ जुलैपर्यंत राबविली जाणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- तपास यंत्रणांनी एका आरोपीवर विश्वास ठेवावा का?; अजित पवार यांचा सवाल

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड व यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये ८,०९८ गावांमधील १ कोटी ३ लाख लोकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या सेवन करण्यासाठीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या सहाही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय समितीच्या सभा घेतल्या असून नागरीकांना गोळ्या वाटपासाठी ४१ हजार ३५२ कर्मचारी व ४,१३५ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन मिशन मोडवर ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

क्लिक करा आणि वाचा- विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांनी व्यक्त केले मत, म्हणाले…

दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा ऑनलाईन शुभारंभ प्रसंगी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त डॉ.रामास्वामी, संचालक डॉ.अर्चना पवार यांच्यासह सहाही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी डॉक्टर दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

क्लिक करा आणि वाचा- ‘केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही’Source link

Rajesh Tope: Elephantiasis Eradication: हत्तीरोग निर्मूलन: राज्यातील 'या' सहा जिल्ह्यामध्ये राबवणार मोहीम - elephantiasis eradication campaign to be implemented in six districts of the state
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News