Reliance AGM 2021: रिलायन्सची रिटेलमध्ये वेगाने प्रगती; आगामी 3 वर्षात 10 लाखाहून अधिक रोजगार देणार, मुकेश अंबानी यांचा दावा

0
34

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 44 व्या वार्षिक बैठकीत गुरुवारी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ते म्हणाले की रिलायन्स इंडस्ट्रीजचा प्रवास आतापर्यंत चांगला झाला आहे असून रिटेल क्षेत्रात वेगाने पुढे गेलो आहोत. आगामी काळात रिटेल क्षेत्रात आणखी वाढ होणार असून रिटेलमध्ये मूल्य निर्मितीची बरीच क्षमता असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले.

रिलायन्स रिटेलमध्ये 8 पैकी 1 भारतीय शॉपिंग करतो
दिवसेंदिवस रिलायन्स रिटेलमध्ये हातपाय पसरत असून सध्या 8 पैकी 1 भारतीय रिलायन्स रिटेलमधून खरेदी करत असल्याचं अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स रिटेलचा व्यवसाय सर्वात वेगवान झाला आहे. ते म्हणाले की, गेल्या वर्षी 1500 नवीन स्टोअर उघडण्यात आले. Apparel Biz मध्ये, 1 वर्षात 180 कोटी युनिक विकले गेले. तर ग्राहक इलेक्ट्रॉनिक्समध्ये परिस्थिती बळकट झाली.

मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, रिटेल क्षेत्रात पुढील तीन वर्षात रिलायन्स सुमारे 10 लाख लोकांना नोकरी देईल. यासह ते असेही म्हणाले की, गेल्या एका वर्षात रिलायन्स रिटेलने 65 हजार नवीन रोजगार निर्माण केले आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांची संख्या आता 2 लाखांहून अधिक झाली आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की आम्ही संशोधन, डिझाइन आणि उत्पादन क्षमतेवर गुंतवणूक करणार आहोत. यासह ते म्हणाले की आम्ही देशातील सोर्स आणि खप असलेल्या ठिकाणांना पुरवठा साखळीच्या पायाभूत सुविधांनी जोडणार आहोत.

अक्षय ऊर्जेसाठी 60 हजार कोटींची मोठी गुंतवणूक
ग्लोबल न्यू एनर्जीवर जोर देताना मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत सांगितले की 2021 मध्ये ते न्यू एनर्जी बीझ (New Energy BIZ) सुरू करतील. ते म्हणाले की न्यू एनर्जी व्यवसायात रिलायन्स अग्रणी असेल. त्यासाठी 4 गीगा फॅक्टरीची स्थापना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले. रिलायन्स अक्षय ऊर्जेसाठी 60 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की, 2030 पर्यंत रिलायन्सचे 100 गीगावॅट ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे. ते म्हणाले की सौर ऊर्जेच्या साठवणुकीसाठी बॅटरीचे नवीन तंत्रज्ञान आणले जाईल. मुकेश अंबानी म्हणाले की आम्ही पंतप्रधानांच्या स्वावलंबी भारताच्या संकल्पासोबत आहोत.

Source link