Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रroh​it pawar contact number: ...म्हणून रोहित पवारांनी कीर्तनकाराला दिली नवी कोरी कार...

roh​it pawar contact number: …म्हणून रोहित पवारांनी कीर्तनकाराला दिली नवी कोरी कार – rohit pawar presents a new car to a kirtankar


हायलाइट्स:

  • …म्हणून रोहित पवारांनी कीर्तनकाराला दिली नवी कोरी कार
  • सावता महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार देशभरात व्हावा
  • रोहित पवारांच्या हस्ते सावता महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार

नगर : कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील संत सावता महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात आला. यावेळी पवार यांनी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांना नवी कोरी कार भेट दिली. सावता महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार संबंध राज्य व देशभरात व्हावा यासाठी हे वाहन भेट देत असल्याचे पवार यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार अरणगाव येथे रमेश महाराज वसेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळेस महाराजांचे जुने वाहन पाहून त्यांनी नवीन कार देण्याचे ठरविले होते. आंबीजळगाव येथील संत सावता महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आमदार पवार यांच्यामार्फत करण्यात आला आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण सारखी महत्वपूर्ण कामे हाती घेत या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला.

रोहित पवार यांनी महाराजांच्या सेवेसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून वाहन भेट म्हणून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत रविवारी पवार यांनी नवे वाहन रमेश महाराज वसेकर यांना सुपूर्द केले. यावेळी पवार म्हणाले, ‘संत सावता महाराजांचे अनुयायी संबंध राज्यभरात आहेत. त्यांच्या कार्याची महती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी व समाज उद्धराचे कार्य पार पडावे, यासाठी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांना वाहन भेट म्हणून देण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यात खेडोपाडी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून संत सावता महाराजांच्या विचारांची पेरणी करता येईल.’

rohit pawar

roh​it pawar contact number: ...म्हणून रोहित पवारांनी कीर्तनकाराला दिली नवी कोरी कार - rohit pawar presents a new car to a kirtankarWeather Alert : पुढच्या ५ दिवसांत मान्सूनचं कमबॅक, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
रमेश महाराज वसेकर म्हणाले की, ‘आमदार पवार यांनी संत सावता महाराजांच्या मंदिराचा अतिशय सुंदर प्रकारे जीर्णोद्धार करून मंदिराला एक लौकिक प्राप्त करून दिला आहे. संतांची सेवा हीच मोठी सेवा आहे. आमदार पवार यांच्यासारखे एक युवा नेतृत्व संत परंपरेच्या उत्कर्षासाठी कायम झटत आहे, हे पाहून अभिमान वाटतो. याच दृष्टिकोनातून त्यांनी आयोजित केलेली राज्यस्तरीय भजन स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम असून यातून संत परंपरेतील एकता, समता यांचा संदेश युवा पिढीपर्यंत पोहचवण्याचे यातून काम होत आहे.’
roh​it pawar contact number: ...म्हणून रोहित पवारांनी कीर्तनकाराला दिली नवी कोरी कार - rohit pawar presents a new car to a kirtankarगळफास लावून दोन बहिणींची आत्महत्या, पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोरSource link

roh​it pawar contact number: ...म्हणून रोहित पवारांनी कीर्तनकाराला दिली नवी कोरी कार - rohit pawar presents a new car to a kirtankar
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News