Rohini Khadse Questions BJP: खडसे, मुंडे, तावडे या बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?; रोहिणी खडसेंचा भाजपला बोचरा सवाल – rohini khadse slams bjp over obc reservation protest

0
24


हायलाइट्स:

  • ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचं राज्यभर आंदोलन
  • रोहिणी खडसे यांचा भाजपला बोचरा सवाल
  • खडसे, मुंडे, तावडे आणि बावनकुळेंचा राजकीय बळी का घेतला? – रोहिणी खडसे

जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं आज राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनाच्या निमित्तानं राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडं, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी आज एक ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी भाजपच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. ‘ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना माननीय खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना,’ असा बोचरा सवाल रोहिणी खडसे यांनी फडणवीसांना केला आहे.
रोहिणी खडसे यांनी कालही या संदर्भात ट्वीट करत फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. ‘आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर १ ऑगस्ट २०१९ रोजी आणि १८ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारे केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाहीत, हे तुम्हाला माहीत व्हायला हवे होते,’ असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपच्या वतीनं राज्यभरात चक्का जाम आंदोलन सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मोठे नेते स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. तर, दुसरीकडं भाजपच्या खोटारडेपणाचा निषेध करत काँग्रेसनंही राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे.
आणखी वाचा:

ईडी, सीबीआयचा ससेमिरा; संजय राऊत भडकून म्हणाले, आम्हीही बघून घेऊ!

स्वीय सचिवांच्या अटकेनंतर अनिल देशमुखांना ईडीकडून समन्सSource link