रोहित शर्मा वन-डे क्रिकेटर ऑफ द इयर, कोहलीची कसोटी आणि वन-डे टीमचा कर्णधार म्हणून निवड

वृत्तसंस्था : शासननामा न्यूज । ऑनलाईन

आयसीसीने बुधवारी 2019 च्या पुरस्कार जाहीर केले. यामध्ये भारतीय सलामीवीर रोहित शर्माला ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तर विराट कोहलीला कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. विश्वचषक 2019 मध्ये स्पिरिमेंटशिपसाठी कोहलीला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्यात आला. विराट कोहलीने विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यादरम्यान स्टीव्ह स्मिथला चिडवण्यापासून चाहत्यांना रोखले होते.

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू बेन स्टोक्सला प्लेअर ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आले. 2019 मध्ये 59 विकेट घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू बनला. रिचर्ड इलिंगवर्थ यांना अंपायर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला.

लबुशाने वर्षातील उदयोन्मुख खेळाडू

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबुशाने याला इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर देण्यात आला. तर भारताच्या दीपक चहरला टी-20 मध्ये परफॉर्मेंस ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला. दीपकने 10 नोव्हेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध नागपूर टी-20 सामन्यात 7 धावा देऊन 6 गडी बाद केले होते.

2019 मध्ये रोहितने सर्वाधिक वन-डे धावा केल्या

रोहित शर्माने गेल्या वर्षी 28 एकदिवसीय सामन्यांत 57.30 च्या सरासरीने सर्वाधिक 1490 धावा केल्या. यामध्ये त्याने 7 शतके झळकावली असून त्यातील 5 शतके विश्वचषकात ठोकली आहेत. याबाबत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. कोहलीने 26 सामन्यांत 59386 च्या सरासरीने 1377 धावा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here