Monday, June 21, 2021
Homeमहाराष्ट्रMaratha reservation: रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार -

Maratha reservation: रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार –

हायलाइट्स:

  • संभाजी राजे यांचा रायगडावरुन सरकारला इशारा
  • मराठा आरक्षणाप्रश्नी घेतली भूमिका
  • १६ जूनला पहिला मोर्चा काढणार

रायगड (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत अल्टिमेटम देणाऱ्या खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास १६ जूनपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी किल्ले रायगडावरुन केली आहे.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्यानंतर भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ६ जूनपर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर थेट रायगडावरुन घोषणा करु असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. त्यावरुन आज शिवराज्यभिषेक दिनी संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक दिली आहे.

आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे. असं घणाघात संभाजीराजे यांनी केला आहे. तसंच, छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून येत्या १६ जूनला पहिला मराठा मोर्चा निघेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात काय सुरु, काय बंद?; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश

मराठा समाजाचा मागण्या मान्य न झाल्यास मुंबई ते पुणे लाँग मार्च काढणार, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला आहे. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवालात काही शिफारसी केल्या होत्या, मी पत्रकार परिषद घेऊन ज्या गोष्टी नमूद केल्या होत्या त्याच समितीने सांगितल्या. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, समाजाला वेठीस धरु नये, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

हेही वाचा : तिसऱ्या लाटेचा धोका; मुलांच्या चाचण्यांसाठी भारत बायोटेककडे विचारणा

‘माझा लढा ७० टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. आपलेच पुढारी कोण चुकलं-कोण बरोबर या स्पर्धेत लागले. मागच्या सरकारचे लोकं म्हणाले आत्ताच्या सरकारने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचं सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. मी मोठा की तू मोठा, हेच चाललं आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही,’ असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Source link

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Maratha reservation: रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार - भाऊ आला आणि ‘त्या’ कोविड सेंटरमध्ये चैतन्य पसरलं! | शासननामा न्यूज - Shasannama News

    […] […]

  2. Maratha reservation: रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार - Ajit Pawar vs Chandrakant Patil: ‘ज्यांना काम नाही ते लोक असे बोलतात’; अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पल

    […] […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW