Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रsanjay raut meet ashish shelar: आशिष शेलारांसोबत गुप्त भेट?; संजय राऊत स्पष्टचं...

sanjay raut meet ashish shelar: आशिष शेलारांसोबत गुप्त भेट?; संजय राऊत स्पष्टचं बोलले – sanjay raut reaction on rumuors about his meeting with bjp leader ashish shelar in mumbai


हायलाइट्स:

  • संजय राऊत- आशिष शेलार यांच्यात भेट?
  • शनिवारी झाली होती गुप्त भेट
  • या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांची आणि भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांची शनिवारी मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरात भेट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, आता संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळलं असून आमची अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, लोकांकडून अशा अफवा पसरवल्या जातात, त्यांचं मी स्वागतच करतो, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकारणातील गुप्त भेटींचे सत्र सुरू आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं बोललं जात होतं. या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असतानाच आधी शेलार यांनी तर आता संजय राऊत यांनी भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच, जरी अशी भेट झाली असेल तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?, असा सवाल त्यांनी केला आहे.

‘महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटले, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय?, पण मुळात अशा पद्धतीची भेट झालेलीच नाही. मी कामात होतो. पण तरी अफवा पसरवण्यात आल्या. पण अशा अफवांमुळं राजकारण हलतं का? अस्थिर होतं का? अजिबात नाही. महाराष्ट्राच्या सरकारला काही अडचणी निर्माण होतील का? अजिबात नाही. अशा अफवा पसरवल्यामुळं आमचे तीन पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. त्यामुळं अशा अफवा पसरवण्याचे हे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः तेव्हा विचार करू; शेलार- राऊत भेटीवर भाजप नेत्याचं सूचक विधान

‘माझी कोणाशीही भेट झालेली नाही, असं सांगातानाच शेलार यांच्यासोबतच्या जुन्या भेटीचा संदर्भ देत या भेटीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. महाराष्ट्रातलं राजकारण हिंदुस्तान- पाकिस्तानसारखं नाही की गोळ्या घाला आणि संपवा. या प्रकारे अफवा पसरवल्यामुळं काहीही होणार नाही. उद्यापासून अधिवेशन सुरु होतंय. त्याआधी अफवा पसरवल्या जात आहेत. ज्यांना माझ्यामुळं त्रास होतो. माझ्या बोलण्यामुळं, लिखाणामुळं ते माझ्याबद्दल अशा अफवा पसरवतात, अशा अफवांचं मी स्वागतच करतो,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

वाचाः ‘पोलिसांच्या माध्यमातून मराठ्यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न’

दरम्यान, आज सकाळी संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है।’, असं सूचक विधान राऊत यांनी या ट्विटमधून केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून राऊतांनी शेलारांसोबतच्या भेटीचे वृत्त फेटाळले असल्याची चर्चा आहे.Source link

sanjay raut meet ashish shelar: आशिष शेलारांसोबत गुप्त भेट?; संजय राऊत स्पष्टचं बोलले - sanjay raut reaction on rumuors about his meeting with bjp leader ashish shelar in mumbai
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News