संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा घ्या, नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
40

अमरावती (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकार सत्तेचा दुरुउपयोग करत असल्याचा आरोप नवनीत कौर राणा यांनी केला आहे. कंगना रनौत यांच्या कार्यालयावरील बीएमसीने केलेली कारवाई चुकीची असल्याचंही त्या म्हणाल्या

त्याशिवाय, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी महिलांचा अपमान केला आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्याचा ठेका घेतला आहे का? ते वारंवार महिलांचा अपमान करत आहेत, आपली मर्यादा सांभाळा”, अशा इशारा नवनीत राणा यांनी संजय राऊतांना दिला. तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संजय राऊत यांना पाठिंबा आहे का? त्यांनी आता संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा मागायला पाहिजे”, असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

राज्यात कोरोना हा वाढत आहे. तर भंडारा-गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला. तेथे मुख्यमंत्री गेले नाही. त्यामुळे “मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर निघा”, असा टोलाही खासदार नवनीत राणा यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here