Indian Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वेकडून इच्छुकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये नर्सिंग स्टाफ पदासाठीची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा नोकरीसाठी अर्ज पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळावर wr.indianrailways.gov.in दाखल करावा. उमेदवारांनी मुलाखत फेरीसाठी उपस्थित राहणं आवश्यक असेल. पश्चिम रेल्वे भरती प्रक्रियेसाठीची प्रत्यक्ष प्रकट मुलाखत फेरी (वॉक इन इंटरव्ह्यू) 21 जून 2021 ला निर्धारित करण्यात आला आहे.
वडोदरा कोविड डिव्हीजनमध्ये पूर्णवेळ तीन महिन्यांच्या कंत्राटी करारान्वये पॅरामेडिकल विभागाअंतर्गत नोकरीच्या 18 जागा भरण्यात येणार आहेत.
भरतीसाठीची महत्त्वाची माहिती
पद- स्टाफ नर्स
रिक्त जागा- 18
पगार- Rs 44900 in L-7
नोकरीसाठीची पात्रता
नोकरीसाठी अर्जदाराकडे नोंदणीकृत नर्सिंगचं प्रमाणपत्र असणं महत्त्वाचं आहे. शिवाय जनरल नर्गिंगमध्ये तीन वर्षांचा कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, अशी अट घालण्यात आली आहे.
नोकरीसाठीचा अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी निर्धारित ठिकाणी पोहोचावं. सोबत येताना नोकरीसाठीचा अर्ज (फॉर्म) आणि अटेस्टेड कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि त्यांच्या मुळ प्रती आणाव्यात.
मुलाखतीची वेळ :
सकाळी 10 ते सायंकाळी 5
नोंदणीसाठीची वेळ :
सकाळी 9 ते दुपारी 12
मुलाखतीची वेळ :
21 जून
अधिक माहितीसाठी ‘येथे’ क्लिक करा.