
महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगार उपलब्ध असण्याविषयीची माहिती तसेच नोंदणी प्रक्रिया आणि नोकरीसाठी अर्ज करणे, प्रशिक्षणाविषयीची संपूर्ण माहिती, रोजगार मेळाव्यांबद्दल माहिती त्याचप्रमाणे मेळाव्यात सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, कौशल्य विकास योजनेत सहभागी होणे, उपलब्ध नोकऱ्यांसाठी अर्ज करणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महास्वयम् रोजगार नोंदणी 2023 महाराष्ट्र पोर्टलचे वैशिष्ट्ये (features)
महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक एकत्रित सर्व सुविधायुक्त महास्वयम् रोजगार नोंदणी वेब पोर्टल सुरु केले आहे, या पोर्टलच्या अंतर्गत महाराष्ट्रातील नोकरी शोधणाऱ्या बेरोजगार तरुणांना रोजगार शोधण्यासाठी ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे. राज्यातील बेरोजगार तरुण या महास्वयम् पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. या पोर्टलच्या माध्यमातून विविध कंपन्या, उद्योग, सरकारी, निमसरकारी, विविध संस्थांव्दारे उपलब्ध करण्यात आलेल्या रोजगारांची माहिती बेरोजगार तरुणांना सहजपद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. महास्वयम रोजगार नोंदणी पोर्टलच्या अंतर्गत विविध कौशल्यसंबंधित उपक्रमांमध्ये रोजगार शोधणाऱ्या उमेदवारांना सुलभतेने रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या महास्वयम पोर्टलचे प्रथम तीन भाग करण्यात आले होते, पहिला भाग बेरोजगार तरुणांसाठी महारोजागर (Maharojgar), यामध्ये दुसरा भाग होता कौशल्य विकास (MSSDS) आणि पोर्टलचा तिसरा भाग म्हणजे स्वयंरोजगार (Mahaswayam Rojgar) शासनाने या तीन भागांमधील सुविधांसाठी वेगवेगळे पोर्टल्स उपलब्ध करून दिले होते. ते पोर्टल्स आता महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल अंतर्गत जोडण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील रोजगाराच्या शोधात असलेले सर्व बेरोजगार तरुण, शासनाच्या महास्वयम् पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून त्यांच्या कौशल्या प्रमाणे व पात्रतेप्रमाणे रोजगार मिळवू शकतात.
- महाराष्ट्र शासनच्या कौशल्य विकास आणि उद्योग विभागाव्दारे हे महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल तयार करण्यात आले आहे.
- या पोर्टलचा उद्देश आहे राज्यात कौशल्य विकासाला गती देणे त्याचबरोबर राज्यातील रोजगार शोधणाऱ्या तरुणांना नोकरीच्या संधी उपलभ करून देणे.
- महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता तसेच विविध प्रकारचे सर्व कौशल्यविकास प्रशिक्षण आणि उद्योग विकासासंबंधित माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे.
- या महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण, विद्यार्थी नोंदणी केल्यानंतर विविध प्रकारच्या सर्व कौशल्यविकास प्रशिक्षणाची माहिती तसेच विविध प्रकारच्या रोजगारांसंबंधित माहिती आणि रोजगार मेळाव्या संबंधित माहिती मिळवू शकतात.
- या वेबपोर्टलच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक त्यांच्या आस्थापनांची ऑनलाइन नोंदणी पोर्टलवर करून, पोर्टलव्दारे उद्योजक त्यांच्याकडील मनुष्यबळाची मागणी पूर्ण करून घेऊ शकतात.
महास्वयम् वेबसाईटवर विविध पर्यायांतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी (Employment) पर्यायांतर्गत नोकरी शोधणारे तरुण ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करू शकतात, शैक्षणिक पात्रता सुविधा देण्यात आली आहे, तसेच रोजगार शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उद्योजकता (Entreprneurship) या पर्यायांतर्गत स्वयंरोजगारची सुविधा आणि कौशल्य विकास (Skill Development) पर्यायांतर्गत कौशल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पोर्टल अंतर्गत उद्योजकांसाठी (Employer) या पर्यायांतर्गत तात्पुरती किंवा कायम रिक्त पदे, रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमा अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने पदे अधिसूचित करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. या पोर्टलवर यासर्व सुविधा विनामुल्य उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
Maharashtra Mahaswayam Online Portal Highlights
योजनेचे नाव | महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र 2023 |
---|---|
व्दारा सुरुवात | महाराष्ट्र शासन |
राज्य | महाराष्ट्र |
आधिकारिक वेबसाईट | https://rojagar.mahaswayam.gov.in |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचे बेरोजगार तरुण |
उद्देश्य | तरुणांना रोजगार शोधण्याचे उत्तम माध्यम उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
विभाग | कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता |
महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल उद्दिष्ट (Objectives)
महाराष्ट्र राज्य हे लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून देशात दुसरे मोठे राज्य आहे, आपल्याला दिसून येईल राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे, ज्यांच्या कडे डिग्री किंवा डिप्लोमा आणि अनुभव असून सुद्धा तरुण बेरोजगार आहे तसेच ज्यांच्या कडे कौशल्य आहे त्यांना त्यांच्या कौशाल्याप्रमाणे रोजगार मिळाला नाही, बेरोजगारीची हि समस्या संपूर्ण राज्यांमध्येच आहे, शासनाकडून बेरोजगारीची हि समस्या कमी करण्याच्या दृष्टीने तसेच तरुणांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळावा या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.
महाराष्ट्र शासनाव्दारा सुरु करण्यात आलेल्या महास्वयम् पोर्टलचा उद्देश आहे राज्यातील युवकांना त्यांच्या कौशल्यासंबंधित रोजगार मिळावा आणि उद्योजक यांना एकत्रित एकाच प्लॅटफॉर्मवर आणणे तसेच या पोर्टलच्या माध्यमातून सभासदांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या रिक्त जागा आणि उद्योजकता विकास कार्यक्रमांशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. महास्वयम् पोर्टलचे उद्दिष्ट केवळ कौशल्य विकास व तरुणांनासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि राज्यातील युवकांना सशक्त करणे एवढेच नाही तर रोजगार देणारे व्यवसायी व रोजगार शोधणारे आणि इतर सभासदांना एका समान व्यासपीठावर एकत्रित करणे हे आहे. महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलव्दारे विविध कंपन्यांकडून रोजगार शोधणाऱ्यांना नोकऱ्या सहज उपलब्ध करून दिल्या जातात.
महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल उपलब्ध सुविधा
महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केल्यानंतर खालीलप्रमाणे सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात
- कार्पोरेशन प्लान
- स्वयंरोजगार योजना
- स्वयंरोजगार कर्ज
- ऑनलाइन कर्जाची पात्रता
- नोकरी शोधणे
- रोजगारासाठी अर्ज करणे
- कर्ज परतफेड स्थिती
- हेल्प लाईन क्रमांक
- अशा प्रकारच्या महत्वाच्या सुविधा महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात
महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल 2023 लाभ
महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणीकृत उमेदवारांना खालीलप्रमाणे सुविधा आणि लाभ उपलब्ध करून दिल्या जातात.
- महास्वयम् पोर्टलवर महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात या पोर्टलचा लाभ राज्यातील तरुणांना होणार आहे.
- राज्यातील रोजगार इच्छुक बेरोजगार तरुणांनी या पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केल्यावर त्यांना रोजगारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
- या पोर्टलच्या माध्यमातून कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण दिल्या जाईल, त्यामुळे राज्यात कौशल्य विकास योजनेला गती मिळेल.
- महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार त्यांच्या कौशल्यासंबंधित उपक्रमांमध्ये नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- राज्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार संदर्भात, कौशल्य विकास योजना तसेच रोजगार संबंधित मेळावे या सर्व सुविधांसाठी उमेदवारांना वेगवेगळ्या पोर्टलवर लॉगिन करण्याची आवश्यकता नाही या सर्व सुविधांचा लाभ एकाच महास्वयम् पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून मिळवू शकतात.
- महास्वयम् पोर्टलवर उद्योजक त्यांच्या आस्थापना संबंधित किंवा कंपनी संदर्भात जाहिरात सुद्धा करू शकतात, त्यामुळे बेरोजगार तरुणांनी महास्वयम् पोर्टवर नोंदणी केल्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी सहजपणे उपलब्ध होतील. या पोर्टलमुळे नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगारासंदर्भातील संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून नोकरी शोधणारे बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांना रोजगार मेळाव्यात सहभागी होणे सुलभ झाले आहे, तसेच सुलभ प्रशिक्षण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- या पोर्टलच्या माध्यमातून उद्योजकांना त्यांना आवश्यक असलेल्या कौशल्यासंबंधित मनुष्यबळ आणि सुयोग्य उमेदवारांची यादी काढणे इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पोर्टलवर उद्योजकांनी त्यांच्या आस्थापनांची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी पूर्ण करून घेऊ शकतात.
महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलवर लागणारी आवश्यक कागदपत्र
महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलवर अर्जदाराला नोंदणी करण्याच्या वेळेस आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला
- अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदाराचे वय कमीत कमी 14 वर्ष पूर्ण असावे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका
- असल्यास कौशल्य प्रमाणपत्र
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- नगरपरिषद किंवा सरपंचाने दिलेले प्रमाणपत्र
महास्वयम् पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता
- या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 14 वर्ष असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तर त्याला वेळोवेळी आपला अनुभव, शैक्षणिक योग्यता आणि संपर्क तपशील अपडेट करावा लागेल.
- या पोर्टलवर बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.
महास्वयम् पोर्टल या घटकांच्या अंतर्गत नोंदणी केली जाते
- कमी कालावधीचे प्रशिक्षण :- यासाठी संबंधित संस्था आहे महाराष्ट्र राज्य स्कील डेव्हलपमेंट सोसायटी.
- जास्त कालावधीचे प्रशिक्षण :- यासाठी संस्था आहे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय.
- रोजगार मार्गदर्शन आणि चर्चा :- यासाठी संबंधित संस्था आहे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालय.
- स्टार्ट-अप आणि नाविन्यता :- महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी.
- कर्ज :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
घटक | संबंधित संस्था | अधिकृत वेबसाईट |
---|---|---|
कमी कालावधीचे प्रशिक्षण | महाराष्ट्र राज्य स्कील डेव्हलपमेंट सोसायटी. | इथे क्लिक करा |
जास्त कालावधीचे प्रशिक्षण | व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय | इथे क्लिक करा |
रोजगार मार्गदर्शन आणि चर्चा | कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालय | इथे क्लिक करा |
स्टार्ट-अप आणि नाविन्यता | महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी | इथे क्लिक करा |
कर्ज | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित |