महाराष्ट्र राज्यात वस्त्रोद्योग वाढीसाठी तसेच या व्यवसायाला उभारी मिळावी यासाठी शासना कडून इतर अनुदान देण्यात येते, त्याचप्रमाणे आता वीज अनुदान शासनाने मंजूर केल्यामुळे बंद पडत चाललेले वस्त्रोद्योग पुन्हा सुरु होऊन, त्यातून मोठया प्रमाणात स्थानिक नागरिकांना रोजगार मिळणार आहे, सकल राष्ट्रीय उत्पादनातील मोठा हिस्सा औद्योगिक उत्पादन, रोजगार निर्मिती, निर्यात उत्पन्न या बाबी लक्षात घेता देशाच्या अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योगाची मात्वाची भूमिका आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनातील चवदा टक्के, राष्ट्रीय सकल उत्पादनातील चार टक्के आणि देशाच्या एकूण निर्यातीतील तेरा टक्के हिस्सा वस्त्रोद्योगाचा आहे, देशात वस्त्रोद्योग रोजगार निर्मितीचे मोठे साधन आहे. भारतातील वस्त्रोद्योगांमध्ये सुमारे पाच कोटी नागरिक प्रत्यक्ष काम करतात.
जगातील वस्त्रोद्योगाच्या एकूण क्षमतेपैकी भारताची वस्त्रोद्योगाची क्षमता दुसऱ्या क्रमांकाची आहे, राज्यामध्ये जिनिंग, स्पिनिंग आणि विव्हिंग या क्षत्रात वाढ मोठया प्रमाणात झाली आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरणांतर्ग वीज अनुदान देण्याचे उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहे
- वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे.
- वस्त्रोद्योग क्षेत्रातील निर्यातीत वाटा वाढविणे आणि ते अधिक स्पर्धात्मक बनविणे.
- महाराष्ट्र राज्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक वस्त्रोद्योग निर्माण करणे.
महाराष्ट्र टेक्स्टाईल युनिट्स पावर सबसिडी मुख्य Highlights
योजना | महाराष्ट्र टेक्स्टाईल युनिट्स ऑनलाइन रजिस्ट्रेशन |
---|---|
द्वारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचे टेक्स्टाईल युनिट्स |
उद्देश्य | इलेक्ट्रिक पावर सबसिडी उपलब्ध करून देणे |
विभाग | वस्त्रोद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य |
आधिकारिक वेबसाईट | http://dirtexmah.gov.in/ |
महाराष्ट्र टेक्स्टाईल युनिट्स पावर सबसिडी पात्रता [Eligibility]
- या योजनेंतर्गत सबसिडी मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रता निकष आवश्यक आहे
- वस्त्रोद्योग नोंदणी प्रमाणपत्र असलेली युनिट्स या योजनेमध्ये पात्र आहेत
- राज्य शासन राज्यातील पात्र लाभार्थी वस्त्रोद्योग व्यवसायांना वीज अनुदान प्रती यंत्रमाग दरानुसार दिली जाईल, जी सामान्य आणि अनुसूचित जाती व जमाती साठी बदलत जाते.
महाराष्ट्र टेक्स्टाईल युनिट्स पावर सबसिडी (Required Documents)
- व्यवसायाच्या पॅन कार्डची झेरॉक्स.
- वस्त्रोद्योगाचे मागील सहा महिन्यांचे वीज देयक, अर्ज सादर करण्याआधीचे शेवटचे सहा महिन्याचे वीज देयक.
- उद्योगा मध्ये उत्पादन सुरु आहे याची तपासणी करण्यासाठी नजीकचे खरेदी विक्री देयक, प्रकल्पात उत्पादन नियमित सुरु असल्यास उत्पादित मालाची खरेदी विक्री होते त्या खरेदी विक्री व्यवहाराची प्रत.
- वस्त्रोद्योग NPA झाला नसल्याची खात्री करण्यासाठी बँकेचे प्रमाणपत्र
- वस्त्रोद्योग नोंदणी प्रमाणपत्र.
- उद्योगामध्ये उत्पादनासाठी असलेली सर्व यंत्र सामुग्रीची माहितीचे प्रमाणपत्र.
- लीज डीड/जमीन विक्री करार/भाडे करार कॉपी.
- आवश्यक असल्यास इतर कागदपत्र.
महाराष्ट्र टेक्स्टाईल युनिट्स ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म 2023
राज्यातील सर्व वस्त्रोद्योग युनिट्स शासनाची आधिकारिक वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर आणि त्याचबरोबर वस्त्रोद्योग विभागाकडून मंजुरी मिळविल्यानंतर इलेक्ट्रिक सबसिडी किंवा वीज अनुदानासाठी शासनाची अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणानुसार वीज अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- सर्व प्रथम आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर dirtexmah.gov.in जावे लागेल
- यानंतर आपल्या समोर होम पेज ओपन होईल, होम पेजवर हा पर्याय ‘’Registration Form For Textile Unit Section’’समोर असेल या वर क्लिक करा, पेज ओपन झाल्यावर खालीलप्रमाणे दिसेल
- यानंतर आपल्याला युनिट्स ‘’New Registration’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर वस्त्रोद्योग युनिट्स साठी नवीन सामान्य नोंदणी फॉर्म दिसेल, नोंदणी फॉर्म खालीलप्रमाणे दिसेल
- याप्रमाणे राज्यातील सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प आपल्या व्यवसायाची संपूर्ण अचूक तपशीलवार माहिती भरून आणि त्याबरोबर आवश्यक कागदपत्र आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोसह अपलोड करून आपल्या प्रकल्पाची नोंदणी करू शकतात.
- याप्रमाणे महाराष्ट्र टेक्स्टाईल युनिट्स ऑनलाइन रजिस्ट्रेशन नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व अर्जदारांनी ‘’submit 1st part’’ या बटनावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- अपूर्ण नोंदणी फॉर्म :- ज्या अर्जदाराचा अर्ज अपूर्ण राहिला आहे त्यांनी उर्वरित नोंदणी फॉर्म भरण्यासाठी ‘’Login For Incomplete Registration’’ या पर्यायावर क्लिक करून आपली नोंदणी पूर करू शकतात.
महाराष्ट्र टेक्स्टाईल युनिट्स पावर सबसिडी फॉर्म
वस्त्रोद्योगांनी नवीन युजर म्हणून वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर याप्रमाणे सर्व वस्त्रोद्योग वीज अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. महाराष्ट्र राज्यातील सर्व टेक्स्टाईल युनिट्स इलेक्ट्रिक पावर सबसिडी साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, इलेक्ट्रिक पावर सबसिडी साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- आपल्याला आता थेट शासनाच्या वेबसाईटवर जाऊन सामान्य अर्जाव्दारे वीज अनुदानासाठी नोंदणी करण्यासाठी ‘’Electric Subsidy Form’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता यानंतर महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वस्त्रोद्योग युनिट्स आपल्या युनिक आयडी आणि पासवर्ड या सारखे क्रेडेंशियल वापरून वेबसाईटवर लॉगिन करू शकता. आता वेबसाईट मध्ये लॉगिन झाल्यावर इलेक्ट्रिक सबसिडी फॉर्म दिसेल. या नंतर सबसिडी फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा.
- यानंतर आपण या फॉर्मला ड्राफ्ट म्हणून सेव्ह करू शकतो जेणेकरून नंतर आपण फॉर्म मध्ये आवश्यकतेनुसार बदल करू शकतो.
- यानंतर अर्जदाराने निवडलेल्या स्थानाच्या प्रादेशिक कार्यालयात फॉर्म सबमिट करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
Maharashtra Textile Policy 2018-2023 | Click Here |
---|---|
New Registration | Click Here |
Official website | Click Here |
Maharashtra Textile Policy 2018-2023 | |
Login for Incomplete forms | Click Here |
महाराष्ट्र वस्त्रोद्योग संचयालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर अपूर्ण नोंदणी फॉर्मची लिस्ट, प्रलंबित फॉर्मची लिस्ट आणि त्याचप्रमाणे मंजूर फॉर्मची लिस्ट देखील समविष्ट करण्यात आली आहे, आपण हि लिस्ट वेबसाईटच्या होम पेजवर पाहू शकतो, या व्यतिरिक्त कापड व्यावसाईक नवीन महाराष्ट्र टेक्स्टाईल पॉलिसी 2018 – 2023 पाहू शकता, या पॉलिसीमध्ये महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योगला नवीन चालना देण्यासाठी नवीन उभारी देण्यासाठी योजनांबद्दल माहिती दिलेली आहे. वाचक मित्रहो, महाराष्ट्र वस्त्रोद्योग वीज अनुदान योजने संबंधित आणखी माहिती जाणून घायची असल्यास शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती मिळाऊ शकता. या पोस्ट मधील माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यामतून जरूर कळवा.