शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी

0
18

शासननामा न्यूज ऑनलाईन

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानने सध्या स्वतःला मोठ्या पडद्यापासून दूर ठेवलं आहे. पण सुहाना इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःचे ग्लॅमरस अवतारातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. हटके लुकमधील तिच्या फोटोंवर युजर्सकडून लाइक व कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला जातो.

नुकतेच तिनं इंस्टाग्रामवर स्वतःचा एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे, या फोटोमधील सुहानाचे सौंदर्य आणि मोहक रूप पाहून कोणीही तिची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या पार्टीसाठी हटके व आकर्षक लुक हवा असल्यास आपण देखील सुहानाची स्टाइल फॉलो करू शकता. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम)
(नेपाळच्या ‘या’ मुलीने उडवले आहेत भल्या भल्यांचे होश, कोण आहे ही व काय आहे तिचं ब्युटी सिक्रेट?)

​काळ्या ड्रेसमधील हॉट अवतार

शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी

सुहाना खानने आपला वाढदिवस मित्रमैत्रिणीसोबत साजरा केला होता, त्यावेळेसचा हा फोटो आहे. बर्थ-डे पार्टीसाठी तिनं काळ्या रंगाचा मोहक ड्रेस परिधान केला होता. या स्किनफिटिंग आउटफिटमध्ये डीप कट नेकलाइनसह स्पगेटी स्लीव्ह्ज होते. एकूणचा या ड्रेसमुळे सुहानाला बोल्ड लुक मिळाला होता.

(मेंदू व फुफ्फुसांवर हल्ला करणाऱ्या फंगसचा मुलांवर होऊ शकतो गंभीर परिणाम, वेळीच घ्या ही खबरदारी)

​हेअरस्टाइल होती परफेक्ट

शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी

काळ्या रंगाच्या आउटफिटसह सुहानाने लाइट टोन मेकअप केला होता. मिडल पार्टेड हेअर स्टाइलसह तिनं वेव्ह लुक दिलाय. ड्रेसचे डिझाइन हाइलाइट करण्यासाठी तिनं कमीत कमी ज्वेलरी मॅच केली होती. तिनं केवळ सुंदर ईअररिंग्स घातल्याचे आपण पाहू शकता. तिचा लुक एकदम परफेक्ट दिसत होता.

​सुहानाचा आकर्षक लुक

शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी

सुहाना खानला स्किनफिट कपडे परिधान करणं प्रचंड आवडतं आणि अशा पॅटर्नच्या कपड्यांवरील विशेष प्रेम तिच्या वाढदिवशी देखील पाहायला मिळालं. आपल्या वाढदिवशी तिनं फिकट हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये हॉल्टर नेकलाइनसह डायमंड कट-आउट डिझाइन आपण पाहू शकता.

​ड्रेस होता स्वस्त, पण पर्स होती लाखो रूपयांची

शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी

सुहानाने हे आउटफिट यू.के. स्थित डिझाइनर ब्रँड ‘Ph Polly’कडून घेतलं होतं. या ड्रेसची किंमत जवळपास ३ हजार ६०१ रूपये एवढी होती. पण या ड्रेसवर तिनं मॅच केलेली पर्स प्रचंड महागडी होती. सुहानाने ड्रेसच्या रंगाशीच मॅचिंग असणारी Prada ब्रँडची ब्रश्ड लेदर मिनी बॅग कॅरी केली होती. या बॅगची किंमत जवळपास १ लाख २३ हजार ७४९ रूपये एवढी आहे.

​सुहाना खानचा आवडता ड्रेस पॅटर्न

शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी

सुहाना खानचे बॉडी-हगिंग आउटफिट्सवरील विशेष प्रेम अनेकदा पाहायला मिळालं आहे. एखाद्या पार्टीसाठी ती नेहमीच अशाच पॅटर्नचे ड्रेस परिधान करते. या फोटोमध्येही आपण पाहू शकता सुहानाने जांभळ्या रंगाचा आकर्षक ड्रेस घालून टोंड फिगर फ्लाँट केली आहे.

​स्कर्ट-टॉप लुक

शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी

सुहानाने या फोटोमध्ये स्किनफिट आउटफिट परिधान केल्याचे आपण पाहू शकता. आपल्या न्यू-यॉर्क येथील अपार्टमेंटमध्ये सुहानाने मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी सेलिब्रेट केली होती. या पार्टीसाठी सुहानाने करड्या रंगाचा स्ट्रॅप स्लीव्ह्ज आणि डीप कट नेकलाइन क्रॉप्ड टॉप व मॅचिंग पेन्सिल स्कर्ट घातला होता. हटके लुक मिळावा यासाठी तिनं लाल रंगाचे हील्स मॅच केले होते.

​वजनाने हलक्या असणाऱ्या दागिन्यांची आवड

शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी

सुहानाला वजनाने हलक्या असणाऱ्या ज्वेलरी घालणे अधिक पसंत आहे. करड्या रंगाच्या ड्रेसवर तिनं अशाच काहीशा दागिन्यांची निवड केली होती. सुहानाने गळ्यामध्ये पर्ल नेकलेस, कानात मल्टीपल हूप्स आणि हातामध्ये ब्रेसलेट घातल्याचं आपण पाहू शकता. स्लीक स्ट्रेट हेअरस्टाइल आणि लाइट टोन मेकअपमुळे तिला परफेक्ट लुक मिळाला आहे.

खास मैत्रिणींसोबतची पार्टी

शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी

काही दिवसांपूर्वी सुहानाने अनन्या पांडे, नव्या नवेली आणि शनाया कपूरसोबतचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या पार्टीसाठी सुहानाने लायलॅक शेडमधील कॉर्सेट बॉडीकॉन आउटफिटची निवड केली होती. बोल्ड नेकलाइन डिझाइन असणाऱ्या या ड्रेसमुळे सुहानाला हॉट लुक मिळाला आहे.

Source link