Sharad Pawar: विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांनी व्यक्त केले मत, म्हणाले… – the seat of the speaker of the assembly belongs to the congress party says ncp president sharad pawar

0
22


हायलाइट्स:

  • विधानसभा अध्यक्षपदाची जागी ही काँग्रेस पक्षाचीच आहे- शरद पवार.
  • विधानसभा अध्यक्षपदाबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षानी एकत्रित निर्णय घ्यावा- शरद पवार.
  • कृषी कायदा पटलावर आलाच तर सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल- शरद पवार.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाबाबत भाष्य केले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची जागी ही काँग्रेस पक्षाचीच आहे असे स्पष्ट करताना या संदर्भात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षानी एकत्रित निर्णय घ्यावा, असा सल्ला पवार यांनी दिला आहे. (the seat of the speaker of the assembly belongs to the congress party says ncp president sharad pawar)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट करत कोणतीही राजकीय खलबत्ते झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. राज्यातील काही प्रश्नावर निर्णय घेण्याचा आग्रह करण्यात येत आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण बोलल्याचे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही’

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीच पुढचा कार्यक्रम कसा करायचा यावर चर्चा झाल्याचे पवार म्हणाले. राज्यातील काही प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत आमची चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. आमच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून विधानसभा अध्यक्षपदाची जागा ही काँग्रेस पक्षाची असल्याचे ते म्हणाले. मात्र, या संदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र बसून घ्यावा आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी योग्य त्या उमेदवाराची निवड करावी, असेही पवार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- मी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

कृषी कायद्यावरही शरद पवार यांनी व्यक्त केले मत

शरद पवार यांनी कृषी कायद्यावरही भाष्य केले आहे. पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे असून या कालावधीत कृषी कायदा पटलावर येईल असे मला वाटत नाही. पण जर हा कायदा पटलावर आलाच तर सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. कृषी कायद्यात अनेकांनी बदल सूचवलेले आहेत. कृषी कायद्याबाबत राजू शेट्टी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्याशी चर्चा केली असून केंद्राच्या तिन्ही कायद्यांबाबत अनेक तक्रारी असल्याचे पवार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवाबाबत सरकारची नियमावली जाहीर; ‘इतक्या’ फुटांच्या गणेशमूर्तींनाच परवानगीSource link