Sharad Pawar: sharad pawar: काश्मीरच्या मुद्द्यावर शरद पवारांनी केंद्राला सुनावले, म्हणाले… – sharad pawar has said that prime minister modi should keep his promises to kashmiri leaders

0
13


हायलाइट्स:

  • देशाच्या पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये जाऊन नऊ ते दहा गोष्टी आम्ही तातडीने करू असं जाहीर केलं होतं. आजपर्यंत त्यातली एकही गोष्ट झालेली नाही- शरद पवार.
  • केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरबाबत जे निर्णय घेतले त्याचे परिणाम वाईट होतील असे आम्ही सांगत होतो- पवार
  • मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे. पण मागे जसे त्यांनी जाहीर केले आणि काही झाले नाही तसे होऊ नये अशी अपेक्षा आहे- पवार.

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर ८ पक्षाच्या १४ नेत्यांसोबत काल आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत चर्चा केली. या बैठकीत पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर राज्यात विधानसभा निवडणूक घेतली जाईल असे आश्वासन काश्मिरी नेत्यांना दिले. तसेच जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देखील बहाल केला जाईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या या आश्वासनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधानांनी उचलेल्या पावलाचे स्वागत करताना त्यांनी काश्मीरी नेत्यांना दिलेली आश्वासने पाळली जाणे महत्वाचे असल्याचे सांगत पवार यांनी साशंकता व्यक्त केलीआहे. (Sharad Pawar has said that Prime Minister Modi should keep his promises to Kashmiri leaders)

क्लिक करा आणि वाचा- मुंबई पोलिसांच्या चौकशीनंतर परांजपे बंधूंची सुटका; पुण्यात परतले

शरद पवार यांनी ट्विट करत काश्मीरच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये जाऊन नऊ ते दहा गोष्टी आम्ही तातडीने करू असे आश्वासन दिल्याची आठवण पवार यांनी करून दिली आहे. आजपर्यंत त्यातील एकही गोष्ट पूर्ण झालेली नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. यातील एकही गोष्ट पूर्ण झालेली नसल्याची माहिती काश्मीरमधील तरूण पिढी आम्हाला सांगत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘प्रश्न असा आहे की देशाच्या पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये जाऊन नऊ ते दहा गोष्टी आम्ही तातडीने करू असं जाहीर केलं होतं. आजपर्यंत त्यातली एकही गोष्ट झालेली नाही, हे काश्मीरमधली तरुण पिढी आम्हाला सांगते. पुन्हा एकदा त्यांनी काश्मीरच्या सर्व तरुण नेत्यांना बोलावलं.’

क्लिक करा आणि वाचा- डेल्टा प्लस’मुळे औरंगाबाद सतर्क; शनिवारी व रविवारी पूर्ण लॉकडाऊन लावणार

केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरबाबत जे निर्णय घेतले त्याचे परिणाम वाईट होतील असे आम्ही सांगत होतो याची आठवण पवार यांनी करून दिली. केंद्र सरकारने आमचे न ऐकताच हे निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. मात्र, वर्ष-दीड-वर्षाने का होईना आपला हा निर्णय योग्य नाही या निर्ष्कर्षाप्रत राज्यकर्ते आले आणि तो निर्णय बदलायची तयारी त्यांनी दाखवली, आम्ही त्याचं स्वागत करतो, असे पवार यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला मृत्यू; एकूण २० रुग्णांवर सुरू आहेत उपचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे. पण मागे जसे त्यांनी जाहीर केले आणि काही झाले नाही तसे होऊ नये अशी अपेक्षा आहे,असेही पवार यांनी अधोरेखित केले आहे.Source link