Shirdi Sansthan: शिर्डी संस्थान राष्ट्रवादीला तर काँग्रेसकडे पंढरपूर देवस्थान, असं आहे महामंडळाचं वाटप – shirdi sansthan is allotted to ncp and congress to pandharpur devasthan here is all details

0
16


हायलाइट्स:

  • शिर्डी संस्थान राष्ट्रवादीला तर काँग्रेसकडे पंढरपूर देवस्थान
  • शिवसेनेच्या पारड्यात कोणते महामंडळ?
  • महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका कायम असला तरीसुद्धा आगामी निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्येदेखील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महामंडळातील सदस्य या पदांवर वितरण सुरू आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

आमदारांच्या ताकदीनुसार, महामंडळातील वाटा त्यांना देण्यात येईल. इतकंच नाही तर राज्यातील बहुतांश महामंडळाबाबत तीन पक्षांमध्ये एकमत झाले असल्याची माहितीदेखील एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काही महामंडळांवर चर्चा अद्याप सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री अंतिम निर्णय देतील असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादीला मिळणार शिर्डी संस्थान

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थांचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला तर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद हे काँग्रेसला देण्यात येणार आहे. इतकेच नाहीतर मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे मात्र शिवसेनेकडेच राहील अशी माहिती आहे.
Shirdi Sansthan: शिर्डी संस्थान राष्ट्रवादीला तर काँग्रेसकडे पंढरपूर देवस्थान, असं आहे महामंडळाचं वाटप - shirdi sansthan is allotted to ncp and congress to pandharpur devasthan here is all detailsराज्यात धोका वाढला! आणखी एका जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण आढळला
खरंतर, शिर्डी संस्थानवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू आहे. शिर्डी संस्थेवर राष्ट्रवादीचे नियंत्रण हवं पण काँग्रेस सोडण्यास तयार नाही अशी राजकीय चर्चा रंगली होती. पण यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डी संस्थेसंदर्भात कोणताही वाद सुरू नसल्याचा दावा केला होता. त्यानुसार आता शिर्डी संस्थान हे राष्ट्रवादीकडे देण्यात आले आहे. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष पंधरा वर्ष काँग्रेसकडे होतं तर पंढरपूरचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे होते. मात्र, आता पहिल्यांदाच यामध्ये आदलाबदल करण्यात आली आहे.
Shirdi Sansthan: शिर्डी संस्थान राष्ट्रवादीला तर काँग्रेसकडे पंढरपूर देवस्थान, असं आहे महामंडळाचं वाटप - shirdi sansthan is allotted to ncp and congress to pandharpur devasthan here is all detailsभेटीगाठी, चर्चा सुरूच! प्रशांत किशोर तिसऱ्यांदा शरद पवारांकडेSource link