विदर्भात शिवसेनेला खिंडार? आमदार आशिष जैस्वाल नाराज?

0
23

नागपूर: कालच शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर, आता विदर्भातील सेनेचा मोठा नेता पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरमधील रामटेकमधून शिवसेनेच्या तिकीटावर चारवेळा निवडणूक आलेले आशिष जैसवाल पक्षावर नाराज आहेत. ‘बाहेरच्यांना मंत्रिपदे मिळतात, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय मिळत नाही,’ अशी खंत त्यांनी बोलून दाखवलीये.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना जैसवाल म्हणाले की, विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही, मग पक्षाची वाढ कशी होणार ? मी 30 वर्षे सेनेत काम केले, पण कधीच न्याय मिळाला नाही. पक्ष बाहेरुन आलेल्यांना संधी देतो, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय मिळत नाही. आपल्या नेत्याला संधी मिळत नसल्याने कार्यकर्तेही नाराज असल्याचे जैसवाल यांनी सांगितले.