signs of fading love: तुमचे व जोडीदारामधील प्रेम कमी झालंय का? जाणून घ्या यामागील मोठी कारणे

0
8


दोन व्यक्तींमध्ये प्रेम असणे आणि भावना व्यक्त करणं, यात फार फरक आहे. काही लोकांचं जोडीदारावर भरपूर प्रेम असते, पण वेळेनुसार त्यांच्यातील रोमांस हळूहळू कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत दोन व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होतो. तर काही जण जोडीदावर शंका देखील घेतात. याच कारणामुळे बरीच मंडळी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्यांचे जोडीदाराशी असलेले नाते आणखी खराब होत जाते.

जोडप्यामध्ये रोमांस असणं फार गरजेचं आहे, अन्यथा वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळेच नाते टिकवून ठेवणं दोन व्यक्तींसाठी कठीण होते. कोणत्या कारणांमुळे जोडप्यांमधील रोमांस कमी होतो? जाणून घेऊया सविस्तर माहिती… (फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)
(‘मी त्याच्याशिवाय तासभरही जगू शकत नाही’ करीनाच्या ‘या’ शब्दांमध्ये तैमूरसाठी दडलंय अतूट प्रेम)

​मानसिक तणाव

signs of fading love: तुमचे व जोडीदारामधील प्रेम कमी झालंय का? जाणून घ्या यामागील मोठी कारणे

नात्यातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी जोडप्याने मानसिक ताणतणावापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुमचा जोडीदार कोणत्याही कारणामुळे मानसिकरित्या अस्वस्थ किंवा नैराश्याने ग्रस्त असेल तर निश्चितच तुमच्यात रोमांस होणे फार कठीणच आहे. बहुतेक वेळा असे आढळते की एका पार्टनरला ताण घेण्याची सवय जास्त असते, त्यावेळेस तो/ती हळूहळू अधिक तणावग्रस्त होतात.

अशा परिस्थिती जोडप्यामध्ये शारीरिक जवळीक निर्माण होत नाही. यामुळे लैंगिक जीवनावर वाईट परिणाम होतात. आयुष्यात बर्‍याच समस्या उद्भवू शकतात, परंतु सर्व गोष्टींमध्ये समतोल राखणंच तुमच्या नात्यासाठी चांगलं असते. म्हणूनच सदासर्वदा ताणतणावात राहण्याऐवजी आपल्या जोडीदाराच्या सहवासात राहा.

(‘दीया और बाती हम’च्या संध्या बींदणीने उद्योगपतीशी का केलं लग्न, बहुतांश तरुणींच्या मनात असेच असतात विचार)

​कंटाळवाणे जीवन

signs of fading love: तुमचे व जोडीदारामधील प्रेम कमी झालंय का? जाणून घ्या यामागील मोठी कारणे

दररोजच्या वेळापत्रकामुळे जीवन एकसारखंच भासते. कधीकधी कपल धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये इतके गुंतून जातात की ते एकमेकांसोबत वेळ घालवणंही विसरतात. अशा परिस्थितीत दोघांमधील आकर्षण कमी होऊ लागते. एकमेकांना वेळ देणे, मौज-मजा करणे आणि एकमेकांना भेटवस्तू देणे यासारख्या छोट्या-मोठ्या गोष्टी केल्यास नात्यातील प्रेम वाढत जाते. कंटाळवाण्या जीवनाचे दुष्परिणाम तुमच्या प्रेमाच्या नात्यावर अजिबात होऊ देऊ नका.

(‘रिलेशनशिप नव्हे, मैत्री आहे’ आलियाने रणबीरसोबतच्या नात्याबाबत सांगितली ही गोष्ट, जाणून घ्या फायद्याची माहिती)

​वादविवाद-भांडण वाढणे

signs of fading love: तुमचे व जोडीदारामधील प्रेम कमी झालंय का? जाणून घ्या यामागील मोठी कारणे

कोणतेही नाते कधीही परिपूर्ण नसते, उलट दोन व्यक्तींनी एकत्रित येऊन नाते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जोडप्यामध्ये टोकाचे वाद होतात त्यावेळेस काही मंडळी एकमेकांशी बोलणं पूर्णपणे बंद करतात. नात्यात संवादच नसल्याने दोन व्यक्तींमध्ये दुरावा वाढतोच, पण रोमांस सुद्धा कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत पार्टनर्स एकमेकांना अजिबात वेळ देत नाहीत, यामुळे नात्यात कटुता वाढते.

(‘अक्षयला ती आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती’ रेखाबद्दल रवीनाचे विधान! जाणून घ्या दोघांत तिसरा व्यक्ती कसा येतो?)

​वाईट सवयी

signs of fading love: तुमचे व जोडीदारामधील प्रेम कमी झालंय का? जाणून घ्या यामागील मोठी कारणे

एखाद्या नात्यात दीर्घकाळ राहिल्यानंतर जोडीदारांना एकमेकांचे स्वभाव तसंच सवयी माहिती होतात. म्हणूनच जोडीदाराला त्याच्या गुणदोषांसह स्वीकारणे खूप महत्त्वाचे असते. पण म्हणून जोडीदाराच्या वाईट सवयी सहन करायच्या, असा त्याचा अर्थ मुळीच नव्हे. पण छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे केव्हाही चांगलेच. तुमच्यात जितके वाद कमी होतील, तितकेच जोडीदारासोबत नातं अधिक बहरेल.

(‘मी सॉरी म्हणू शकत नाही..’ शाहिदबद्दल मीराने सांगितलेली ‘ही’ गोष्ट जोडप्यांसाठी असू शकतो मोठा धडा)

​खासगी आयुष्यापेक्षा व्यावसायिक जीवनास महत्त्व देणे

signs of fading love: तुमचे व जोडीदारामधील प्रेम कमी झालंय का? जाणून घ्या यामागील मोठी कारणे

प्रत्येकासाठी व्यावसायिक जीवन खूप महत्त्वाचं असते. पण जर आपण खासगी आयुष्याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण लक्ष करिअरवरच केंद्रित केलं तर याचा तुमच्या नात्यावर निश्चितच परिणाम होईल. कधी-कधी करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतात, पण काही लोक त्यात इतके गुंततात की त्यांना प्रेमाच्या नात्याचा विचार करण्यासाठीही वेळ मिळत नाही. यामुळेही रोमांस कमी होऊ लागतो आणि पार्टनर त्यांच्यापासून दूर जाऊ लागतात.

कठीण परिस्थितीत जोडीदाराकडून सर्वाधिक आधार मिळणे आवश्यक असते, यात काहीही शंका नाही. पण यासाठी तुम्हालाही त्यांना पुरेसा वेळ द्यावा लागेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून जोडीदारासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमचे नाते अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल.

(रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मनाने खचलेल्या कतरिनाला करावा लागला ‘या’ गोष्टींचा सामना, होतात खूप यातना)Source link