Monday, June 21, 2021
Homeमनोरंजनसोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया...

सोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले ‘पैसे वाया घालवले’

बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनम कपूर शानदार व जबरदस्त स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. ज्या पद्धतीने सोनम पारंपरिक पोषाख तसंच बोल्ड डिझाइन आउटफिट्स कॅरी करते, ते सर्वांनाच जमेल; असे मुळीच नव्हे. कारण ही अभिनेत्री फॅशनमधील लेटेस्ट ट्रेंड्स फॉलो सुद्धा करते आणि स्वतःच्या कपड्यांमध्ये वेगवेगळे आकर्षक प्रयोग देखील करत असते.

यामुळेच तिला बॉलिवूडची फॅशनिस्ता म्हटलं जातं. पण स्टाइल स्टेटमेंटमध्ये केलेल्या प्रयोगांवर बऱ्याचदा लोकांकडून नापसंती दर्शवली जाते. परिणामी या अभिनेत्रीला ट्रोलर्सचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम@sonamkapoor आणि इंडियाटाइम्स)

​सोनमच्या लेहंग्याचं डिझाइन होतं सर्वात हटके

सोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया घालवले'

सोनम कपूरने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानीच्या लग्नसोहळ्यास हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी सोनमने सर्वात हटके कपड्यांची निवड केली. सोनमने गडद गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. हा पारंपरिक पोषाख सर्वसामान्य लेहंग्याप्रमाणे नव्हता, तर ड्रेसच्या डिझाइनमध्ये हटके स्टाइल पाहायला मिळाली.

​लेहंगा कोणी केला होता डिझाइन?

सोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया घालवले'

सोनम कपूरनं परिधान केलेला लेहंगा प्रसिद्ध फॅशन डिझाइनर अनामिका खन्नाने डिझाइन केला होता. या आउटफिटमध्ये स्ट्रेटकट स्कर्टचा समावेश होता, ज्यामध्ये प्लीट्स डिझाइन जोडण्यात आलं होतं. तर कमरेच्या भागावर एक रूंद बेल्टही आपण पाहू शकता. यावर सोनमने क्रॉप्ड स्टाइल ब्लाउज घातले होतं.

​ब्लाउजचे आकर्षक डिझाइन

सोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया घालवले'

सोनम कपूरने परिधान केलेल्या ब्लाउजचे डिझाइन प्रचंड हटके होते. जुल नेकलाइन असणाऱ्या या पोषाखामध्ये फुल स्लीव्ह्ज जोडण्यात आले होते. परफेक्ट लुक मिळावा यासाठी सोनमने स्टेटमेंट नेकलेस, ईअररिंग्स आणि मांगटिका असे दागिने घातले होते. लाइट टोन मेकअप, स्मोकी आईज लुकमुळे तिचं रूप मोहक दिसत होतं.

​…यामुळे बिघडला लुक

सोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया घालवले'

सोनमने परिधान केलेल्या लेहंग्यामधील हटके गोष्ट म्हणजे दुपट्टा आणि स्कर्टवर लिहिले गेलेले शब्द. पोषाखावर काळ्या रंगाने डिझाइन केलेले ‘IS AK OK’ आणि ‘SONAM’ हे शब्द आपण पाहू शकता. हीच गोष्ट लोकांना अजिबात आवडली नाही. यावरूनच लोकांनी सोनमची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. ‘असे कपडे कोण परिधान करते’,‘पैसे वाया घालवले’ यासारख्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या.

​लेहंग्याचे डिझाइन कॉपी केलं होतं?

सोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया घालवले'

हे सारं काही इथेच थांबलं नाही. कारण काही दिवसांनंतर एका इंस्टा पेजने सोनमच्या लेहंग्यावर दिसणारं हे हटके डिझाइन अन्य एका डिझाइनचे कॉपी असल्याचं म्हटलं. इंस्टा पेजने नमूद केलं की, ‘IS AK- OK’ ही संकल्पना ऐअर जॉर्डन स्नीकर्सच्या ‘AWOK’ या संकल्पनेशी मिळतीजुळती आहे. जे वोग मॅगझिनचे मुख्य संपादक Anna Wintour यांच्या स्वाक्षरीने प्रेरित होतं.

​सोनमने असा केला स्वतःचा बचाव

सोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया घालवले'

सोनमने ट्रोलर्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा या पेजनं डिझाइन कॉपी केल्याचं म्हटलं तेव्हा अभिनेत्री व तिची बहीण रिचाने त्यावर स्पष्टीकरण दिलं. सोशल मीडियाद्वारे त्यांनी म्हटलं की, अनामिका खन्ना एका गंभीर आजाराचा सामना करत होती. प्रकृती ठीक झाल्यानंतर जेव्हा तिनं काम करण्यास पुन्हा सुरुवात केली.

तेव्हा तिचा मुलगा तिला ‘Everything is ak-ok mom’ असे म्हणत प्रोत्साहन देत होता आणि हेच शब्द तिनं या लेहंग्यावरही जोडले. अनामिकाने असेच डिझाइन असणारे आउटफिट परिधान केल्याची लिंक सुद्धा सोनमने शेअर केली होती.

​इंस्टा पेजने डिलीट केलं पोस्ट

सोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया घालवले'

सोनम कपूर आणि रिया कपूरने स्पष्टीकरण दिल्यानंतर इंस्टाग्राम पेजने आपली पोस्ट डिलीट केली. दरम्यान कोणाच्याही दबावाखाली येत पोस्ट डिलीट न केल्यांचीही माहिती इंस्टा पेजनं दिली.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW