Tuesday, June 22, 2021
Homeमनोरंजनसोनम कपूरने बोल्ड कपड्यांमधील फोटो केले शेअर, ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले 'माझी...

सोनम कपूरने बोल्ड कपड्यांमधील फोटो केले शेअर, ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले ‘माझी बेडशीटही अशीच आहे’

अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर सुपर ग्लॅमरस अवतारातील फोटो शेअर केले आहेत. बऱ्याच दिवसांनंतर तिचा स्टायलिश लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. या फोटोंमध्ये सोनम प्रचंड सुंदर, मोहक व मादक दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या लुकवर लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

दरम्यान सोशल मीडियावर काही लोकांनी अभिनेत्रीला टार्गेट सुद्धा केलं. चित्र-विचित्र कमेंट्स करून लोकांनी सोनमला वाईटरित्या ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. काहींनी तिच्या ड्रेसची तुलना ‘चादर’ आणि ‘पडदा’ या गोष्टींसोबत करत अतिशय वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम)

​अनामिका खन्ना व सोनमने केला ड्रेस डिझाइन

सोनम कपूरने बोल्ड कपड्यांमधील फोटो केले शेअर, ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले 'माझी बेडशीटही अशीच आहे'

सोनमने लेटेस्ट डिझाइनर कलेक्शनमधील आउटफिट परिधान करून फोटोशूट केलं होतं. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिनं सुपर स्टायलिश अवतारातील फोटो शेअर देखील केले. प्रसिद्ध फॅशन डिझाइनर अनामिका खन्नाच्या मदतीने तिनं हे आउटफिट डिझाइन केलं. सोनमने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे आपण या फोटोमध्ये पाहू शकता. या ड्रेसवर सुंदर रंगीबेरंगी एम्ब्रॉयडरी करण्यात आलीय. या ड्रेसमध्ये सोनम प्रचंड सुंदर व मोहक दिसतेय.

​सोनमने कलेक्शनबाबत काय म्हटलं?

सोनम कपूरने बोल्ड कपड्यांमधील फोटो केले शेअर, ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले 'माझी बेडशीटही अशीच आहे'

सोनमने या आउटफिटमधील स्वतःचे सुंदर फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केले होते. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं अनामिका खन्ना आणि ड्रेसच्या डिझाइनचं भरपूर कौतुक केलं. सोनमनं लिहिले होतं की, ‘बरेच लोक मला विचारतात की ट्रेंड्सनुसार चालणाऱ्या या जगात फॅशनेबल दिसण्यासाठी नेमकं काय करावे? याबाबत मी नेहमीच सांगते की फॅशनेबल दिसण्यासाठी सर्वप्रथम कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे. यामुळेच आपला आत्मविश्वास वाढतो आणि खऱ्या अर्थाने आपण फॅशनेबल दिसता’.

पुढे तिनं असंही नमूद केलं आहे की, ‘आपण जे काही परिधान करणार आहोत, त्यामध्ये कम्फर्टेबल असणं किती गरजेचं आहे, याचे महत्त्व अनामिकाला माहिती आहे. तिनं डिझाइन केलेले कपडे परिधान करण्यास कम्फर्टेबल आणि जबरदस्त ग्लॅमरस सुद्धा आहेत’

​…पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सोनम कपूरने बोल्ड कपड्यांमधील फोटो केले शेअर, ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले 'माझी बेडशीटही अशीच आहे'

डिझाइनरचे लेटेस्ट कलेक्शन कमाल आहे, यात शंकाच नाही. पण काही लोकांनी बोल्ड लुकमुळे सोनमला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युजरने सोनमच्या कपड्यांची तुलना त्यांच्या पलंगावरील चादरीशी केली. तर काही लोकांनी आउटफिटला ‘पडदा’ असंही म्हटलं. तर काही लोकांनी आउटफिटमधील बोल्ड डिझाइनवर आक्षेप सुद्धा नोंदवला.

​बोल्ड कपड्यांमुळे अभिनेत्रीवर साधला जातो निशाणा

सोनम कपूरने बोल्ड कपड्यांमधील फोटो केले शेअर, ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले 'माझी बेडशीटही अशीच आहे'

सोनम कपूरला यापूर्वीही बोल्ड फॅशनमुळे ट्रोल करण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या वडिलांसह अभिनेत्री सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित राहिली होती. यावेळेस तिनं डीप कट नेकलाइन कॉर्सेट स्टाइल ड्रेस परिधान केला होता. स्टायलिश लुक पाहून लोकांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं पाहायला मिळालं. ‘आपल्या वडिलांसमोर कोणी असे कपडे घालून उभे तरी कसे राहू शकतात’, असा प्रश्नही एका युजरने विचारला होता.

​हटके फॅशनवरूनही केलं जातं टार्गेट

सोनम कपूरने बोल्ड कपड्यांमधील फोटो केले शेअर, ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले 'माझी बेडशीटही अशीच आहे'

बोल्ड कपडे परिधान करण्याव्यतिरिक्त सोनम कपूर आपल्या स्टाइल स्टेटमेंट वेगवेगळे प्रयोग देखील करत असते. चित्र-विचित्र प्रयोगांमुळेही तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. एका रेड कार्पेट इव्हेंटसाठी अभिनेत्रीनं पिवळ्या रंगाचा फेदर गाउन परिधान केला होता. चाहत्यांनी तिच्या या ड्रेसचं प्रचंड कौतुक केलं. पण काही लोकांनी ड्रेसची तुलना कार्टुनशी करत तिला भरपूर ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW