[ad_1]
हा माजी भारतीय क्रिकेटपटू एकेकाळी भारताचा सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध होता. सोबतच खालच्या फळीत फलंदाजीची मोठी जबाबदारीही त्याच्यावर असायची.
अजय जडेजा
पणजी : भारताच्या एका क्रिकेटपटूला परिसरात कचरा केला म्हणून 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. गोव्याच्या एका गावांतील हा प्रकार असून तेथील सरपंचाने हा दंड आकारला आहे. दरम्यान हा दंड आकारण्यात आलेला खेळाडू म्हणजे एकेकाळी भारताचा सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षक असणारा अजय जडेजा (Ajay Jadeja). 90 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघातील एक महत्त्वाचा खेळाडू असणारा अजय जडेजाचा गोव्याच्या एल्डोना गावांत एक अतिशय सुंदर असा बंगला आहे. तो तिथे वास्तव्यास देखील असतो. (Indias Formar Cricketer Ajay Jadeja Fined For 5000 For throwing Garbage )
जडेजाचे घर असणाऱ्या एल्डोना गावाशेजारीच नचिनोला नावाचे गाव आहे. तेथील सरपंच तृप्ती बांदोडकर यांनी हा दंड आकारला आहे. तृप्ती यांनी एका वृत्तसस्थेशी बोलताना सांगितले की, ”आमच्या गावांत सर्वत्र कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे गावकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत असून आम्ही गावाला कचरामुक्त करण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहोत. दरम्यान बाहेरच्या गावातूनही कचरा आमच्या गावांत फेकला गेल्याचे कळाल्यानंतर आम्ही तपास केला असता संबधित कचऱ्यातील काही कचरा हा अजय जडेजा याच्या घरातील असल्याचे आढळले. त्याच्या नावाची काही बिलं आम्हाला कचऱ्यात सापडली त्यामुळे आम्ही त्याला दंड आकरण्याचा निर्णय घेतला.”
जडेजाकडून संपूर्ण सहकार्य
सरपंच तृप्ती बांदोडकर यांनी पुढे सांगताना म्हणाल्या, ”जडेजाला आम्ही दंड आकरल्यानंतर त्यांनी लगेचच आपली चूक मान्य करत सर्व दंड भरला. दरम्यान इतका मोठा क्रिकेटपटू आमच्या शेजारच्या गावांत वास्तव्यास आहे याचा आम्हाला अभिमान आहे.”
हे ही वाचा –
ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?
IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय
(Indias Formar Cricketer Ajay Jadeja Fined For 5000 For throwing Garbage)
[ad_2]
Source link