[ad_1]
भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
Team India
कोलंबो : भारतीय दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंची फौज विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. तर दुसरीकडे शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वातील युवा खेळाडंचा भरणा असलेला भारतीय संघ श्रीलंका (India tour of Sri Lanka) दौऱ्यावर आहे. दरम्यान कमी अनुभव असणाऱ्या खेळाडूंच्या भारतीय संघाला दौऱ्यासाठी मान्यता दिल्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) श्रीलंकन संघावर आणि क्रिकेट बोर्डावर भडकला आहे. केवळ व्यावसायिक फायद्याकरता अशी तडजोड केल्याचा आरोपही त्याने केला आहे.
श्रीलंकेच्या संघाने जिंकलेला एकमेव एकदिवसीय चषक मिळवून दिलेला कर्णधार अर्जुन रणतुंगा याने आगामी भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांबद्दल मोठं विधान केलं आहे. 13 जुलैपासून भारत आणि श्रीलंका संघात क्रिकेट सामने सुरु होणार आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी भारताने पाठवलेल्या संघात बहुतांश नवखे खेळाडू आहेत. कर्णधार देखील शिखर धवन असून त्याला कप्तानीचा जास्त अनुभव देखील नाही. यामुळे भारताने दिग्गज खेळाडू असलेला संघ इंग्लंडला आणि नवखे खेळाडू असलेला संघ श्रीलंकेला पाठवल्याने अर्जुन रणतुंगा रागवले आहेत.
‘फायद्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाची तडजोड’
अर्जुन रणतुंगा यांनी श्रीलंकेच्या स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितले की, ”भारताने त्याची दुय्यम दर्जाची टीम श्रीलंकेला पाठवली आहे. दिग्गज खेळाडू इंग्लंडला आणि नवखे श्रीलंकेला पाठवून आमच्या देशातील क्रिकेटचा अपमान केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने देखील टेलीव्हिजन मार्केटिगंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही तडजोड केल्यामुळे मी त्यांना या सर्वाबद्दल दोशी मानतो.”
श्रीलंका बोर्डाची सफाई
यावर बोलताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, ”सध्या सर्व अव्वल देशांमध्ये प्रत्येक प्रकारच्या फॉर्मेटसाठी वेगळा संघ आहे. भारतीय कसोटी संघातील खेळाडू इंग्लंडला असले तरी दिग्गज राहुल द्रविडच्या प्रशिक्षक पदाखाली भारताचे स्फोटक टी-20 खेळाडू श्रीलंकेला आहेत. ज्यातील 14 खेळाडूंनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्त्व केले आहे.”
श्रीलंकेच्या फॉर्मवरही ओढले ताशेरे
रणतुंगा यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डावर टीका केल्यानंतर संघाच्या फॉर्मबद्दलही खेळाडूंना खडे बोल सुनावले. श्रीलंका संघाने नुकतीच इंग्लंडमध्ये टी-20 मालिका 3-0 च्या फरकाने गमावली. यासह सलग 5 वी मालिका श्रीलंकेच्या हातातून गेल्याने रणतुंगा यांनी संघावर ताशेरे ओढले. शिस्त आणि ढिसाळ व्यवस्थापनामुळे असे होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भारताचा श्रीलंका दौरा
टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दौऱ्याची सुरुवात वन डे मालिकेने होणार आहे. 13, 16 आणि 19 जुलैला वन डे, तर 22, 24 आणि 27 जुलैला टी ट्वेण्टी मालिका खेळवण्यात येतील.
संबंधित बातम्या
आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO
IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…
(Sri lankan Former captain Arjuna Ranatunga Angry over Sri Lanka Cricket Managment For Allowing India B team to Sri lanka and A team to England)
[ad_2]
Source link