[ad_1]
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांची फी वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. (BCCI Decision Increase Domestic Cricketer Match fee Upcoming Ranaji trophy)
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह
मुंबई : कोरोना विषाणूने सगळ्याच क्षेत्राचं नुकसान झालंय. क्रिकेट क्षेत्राचंही मोठं नुकसान झालंय. पण आता कोरोना हळूहळू ओसरायला लागल्यानंतर भारतीय देशांतर्गत क्रिकेट (Domestic Cricket) पुन्हा रुळावर येत आहे. बीसीसीआयने 3 जुलै रोजी देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केले. त्याअंतर्गत महिला, पुरुष आणि कनिष्ठ स्तरावरील स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयच्या वेळापत्रकात 2021-22 देशांतर्गत हंगामात एकूण 2127 सामने आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी 16 नोव्हेंबरपासून होणार आहे. बीसीसीआयला कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे मागील हंगामात रणजी करंडक रद्द करणं भाग पडले. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांची फी वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. (BCCI Decision Increase Domestic Cricketer Match fee Upcoming Ranaji trophy)
किती रक्कम मिळणार?
सुरु होणाऱ्या हंगामापासून प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. याच विषयीच्या संदर्भाने नुकतीच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांची बैठक पार पडली. यात सामना शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, 20 हून अधिक प्रथम श्रेणी सामने खेळणार्या क्रिकेटपटूंना सामना फी म्हणून रोज 60 हजार रुपये मिळतील.
त्याचबरोबर कमी अनुभवाच्या खेळाडूंना दररोज 35 हजार रुपये मिळतील. म्हणजेच एका सामन्याला 1.40 लाख रुपये मिळतील. खेळाडूंना दररोज भत्ता म्हणून 1000 रुपये देखील मिळतील. तथापि, मागील मोसमातील देशांतर्गत खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना पैसेही मिळालेले नाहीत. यावर्षी कोरोनामुळे रणजी ट्रॉफी घेण्यात आली नव्हती. अशा परिस्थितीत खेळाडूंना पैसे मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत मॅच फीमध्ये वाढ ही खेळाडूंसाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे.
(BCCI Decision Increase Domestic Cricketer Match fee Upcoming Ranaji trophy)
हे ही वाचा :
भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन
सामन्यापूर्वी सेक्स करा, भारतीय क्रिकेटपटूंना कोचने दिला होता सल्ला, खळबळजनक प्रसंग समोर!
[ad_2]
Source link