Home क्रीडा रोहित शर्मा पत्नी रितिकाकडूनच ट्रोल, सोशल मीडियावर चाहत्यांनीही घेतली मजा | Indian Cricketer Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Trolls Him in Instagram Story

रोहित शर्मा पत्नी रितिकाकडूनच ट्रोल, सोशल मीडियावर चाहत्यांनीही घेतली मजा | Indian Cricketer Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Trolls Him in Instagram Story

0
रोहित शर्मा पत्नी रितिकाकडूनच ट्रोल, सोशल मीडियावर चाहत्यांनीही घेतली मजा | Indian Cricketer Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Trolls Him in Instagram Story

[ad_1]





भारताच्या एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्नी रितिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सध्या रोहित आणि रितीका इंग्लंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.

रोहित शर्मा पत्नी रितिकाकडूनच ट्रोल, सोशल मीडियावर चाहत्यांनीही घेतली मजा

Rohit and ritika

लंडन : भारताचा सलामीवीर हिटमॅन नावाने प्रसिद्ध असणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. पण कसोटी मालिका 4 ऑगस्टला सुरु होणार असल्याने तोवर सर्व खेळाडू सुट्टी एन्जॉय करत आहेत. रोहित शर्माही त्याची पत्नी रितिका साजदेह (Ritika Sajdeh) आणि मुलगी समायरासोबत (Samaira) फिरतीवर असून रोहित आणि रितिका दोघेही सोशल मीडियावर भटकंतीचे अपडेट देत असतात. दरम्यान रितिकाने असाच एक फोटो शेअर करताना रोहितला ट्रोल केले असून याआधीही अनेकदा रितिकाने सोशल मीडियावर रोहितची मस्करी केली आहे. (Indian Cricketer Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Trolls Him in Instagram Story)

असे केले ट्रोल

रोहितची पत्नी रितिका हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो स्टोरी शेअर केली. ज्यात ती पुढे आणि मागे रोहित उभा होता. फोटोत रोहितच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नसल्याने रितिकाने कॅप्शन लिहिले होते की, ‘यांना कोणी सांगा की हसणंही कूल असता’ दरम्यान या कॅप्शन आणि फोटोनंतर क्रिकेटप्रेमींनी देखील कमेंट्सा पाऊस पाडत रोहितला हसण्याचा सल्ला दिला. याआधीही रितिकाने एका व्हिडिओ दरम्यान रोहितला ट्रोल केले होते. ज्यात रोहित त्यांच्या कुत्र्यासोबत दिसत होता ज्याला रितिकाने रोहित जास्त क्यूट दिसत नाही असे म्हणत सोबतच्या कुत्र्याला अधिक क्युट दाखवले होते.

rohit ritika post

हीच ती रितिकाची इन्स्टाग्राम स्टोरी

WTC Final मध्ये रोहितची बॅट चालली नाही

भारतासाठी अत्यंत महत्वाचा सामना असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय फलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही ज्यामुळे भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. यावेळी भारताच्या सर्वाधिक आशा असणाऱ्या सलामीवीर रोहित शर्माने देखील अत्यंत सुमार कामगिरी केली. पहिल्या डावात 34 आणि दुसऱ्या डावात 30 धावा करुन रोहित बाद झाला. त्यामुळे भारताला मजबूत सुरुवात मिळू शकली नाही आणि पुढील फलंदाजही तणावाखाली पटपट बाद झाले.

संबंधित बातम्या

आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO

IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…

Photo : श्रीलंका सर करण्यासाठी टीम इंडियाची प्रॅक्टिस जोमात सुरु, बीसीसीआयने शेअर केले सरावाचे फोटो

(Indian Cricketer Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Trolls Him in Instagram Story)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here