BCCI ने यंदाच्या वर्षांतील स्थानिक क्रिकेट स्पर्धांबाबत मोठी घोषणा केली आहे. सर्व स्पर्धांचे वेळापत्रक प्रसिद्ध करत रणजी चषकासह स्थानिक स्पर्धांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेटपटू रणजी सामने खेळताना
मुंबई : भारतीय स्थानिक क्रिकेटर्सना दिलासा देणारी एक मोठी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केली आहे. बीसीसीआयने 2021-22 या वर्षांत खेळवल्या जाणाऱ्या स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक जाहिर केले आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय क्रिकेटपटू वर्षभरात तब्बल 2 हजार 127 सामने खेळणार आहेत. या नव्या क्रिकेट वर्षाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने (Syed Mushtaq Ali Trophy) होणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे रद्द झालेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) यंदा 16 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून पुढील 3 महिने चालणार आहे. या वर्षाची सांगता विजय हजारे ट्रॉफीने होईल. जी 23 फेब्रुवारी ते 26 मार्च या दरम्यान चालणार आहे.
बीसीसीआयने शनिवारी (3 जुलै) या नव्या क्रिकेट वर्षाची घोषणा केली. या क्रिकेट वर्षाला ऑक्टोबर 2021 पासून सीनियर महिला वन डे लीग आणि सीनियर महिला वन डे चॅलेंजर्स ट्रॉफीनं सुरुवात होणार आहे. या वर्षभरात घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धांदरम्यान खेळाडूच्या प्रकृतीबाबतची सर्व काळजी घेतली जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
🚨 NEWS 🚨: BCCI announces India’s domestic season for 2021-22
More Details 👇
— BCCI (@BCCI) July 3, 2021
वर्षभरात 2000 हून अधिक सामने
बीसीसीआने दिलेल्या माहितीनुसार 2021-22 सीजनमध्ये सर्व वयांतील खेळाडूंचे मिळून 2 हजार 127 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात सर्वांत अधिक काळ रणजी ट्रॉफीची स्पर्धा चालणार आहे. तीन महिने चालणारी ही स्पर्धा झाल्यानंतर एक महिनाभर विजय हजारे ट्रॉफीची स्पर्धा चालेल.
अशा पार पडती स्पर्धा
21 सप्टेंबर 2021: सीनियर महिला वनडे लीग
27 ऑक्टोबर, 2021: सीनियर महिला वनडे चँलेंजर ट्रॉफी
20 ऑक्टोबर – 12 नोव्हेंबर 2021 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
16 नोव्हेंबर 2021- 19 फेब्रुवारी 2022: रणजी ट्रॉफी
23 फेब्रुवारी 2022- 26 मार्च 2022: विजय हजारे ट्रॉफी
(BCCI Announce Domestic Cricket Season Indian Players will play 2127 matches in year)