[ad_1]
World Test Championship Final : जागतिक कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यासाठी विजेते आणि उपविजेत्यांना किती बक्षीसं देण्यात येणार आहेत याची माहिती आयसीसीनं सोमवारी दिली. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये हा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या संघाला आयसीसीकडून मानाची गदा देण्यात येणार आहे.
इतकंच नव्हे, तर 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर, म्हणजेच तब्बल 11 कोटी, 71 लाख, 74 हजार रुपये ही बक्षीसपात्र रक्कमही देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर, म्हणजेच 5 कोटी 85 लाख 87 हजार रुपये इतरी बक्षीसपात्र रक्कम देण्यात येणार आहे. बरं अस असतानाही जर हा समना अनिर्णित राहिला, तर मात्र दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येणार आहे.
प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर असणार क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांचं लक्ष
इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यावर सर्वांचं लक्ष आहे. सहसा येथील स्टेडियममधील खेळपट्टी गोलंदाजांना फायद्याची ठरते. पण, यावेळी मात्र तयार करण्यात आलेल्या खेळपट्टी ही प्रत्येक खेळाडूसाठी तितक्याच फायद्याची असणार आहे.
Faf Du Plessis Injury: : फाफ डू प्लेसिसला PCLदरम्यान गंभीर दुखापत, पत्नीची इमोशनल पोस्ट व्हायरल
दरम्यान, सध्याच्या घडीला जागतिक कसोटी क्रमवारीत आकडेवाकीवर नजर टाकल्यास लक्षात येत आहे की, भारतीय संघ 6 मालिका खेळला असून, संघानं 12 सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंडचा संघ 5 मालिका खेळला असून, या संघाने 7 सामने जिंकले आहेत. य़ा गुणतालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ या सामन्यासाठी कोणत्याही सराव सामन्याशिवाय उतरणार आहे. तर, न्यूझीलंडनं काही दिवसांपूर्वीच इंग्लंडला त्यांच्याच मायदेशी पराभूत केलं होतं. तेव्हा आता भारतीय संघ न्यूझीलंडला नमवण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
[ad_2]
Source link