Home क्रीडा मिताली राजचा अनोखा रेकॉर्ड, कोहली-रोहित शर्मासह अनेक दिग्गजांना टाकलं मागे, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

मिताली राजचा अनोखा रेकॉर्ड, कोहली-रोहित शर्मासह अनेक दिग्गजांना टाकलं मागे, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

0

भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने एक एक रेकॉर्ड आपल्या नावे करत भारतीय महिला क्रिकेटर्सही किसीसे कम नही असं वारंवार दाखवून दिलं आहे.

1/6

Mithali Raj Against England

भारतीय पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट टीमही (Indian Women Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. एकमेव कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर आताभारत आणि इंग्लंडच्या रणरागिनींमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगली आहे. ज्यात पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारत पराभूत झाला आहे.दरम्यान दोन्ही सामन्यात कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) ठोकलेल्या अर्धशतकांचा तिला चांगला फायदा झाला असून तिने इंग्लंडमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. तिने रोहित शर्मा (Rohit Sharma), विराटसह (Virat Kohli) अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.

2/6

Mithali Raj One days

मितालीने पहिल्या वनडेमध्ये 72 आणि दुसऱ्या वनडेमध्ये 59 धावा केल्या. या दोन अर्धशतकांमुळे मितालीच्या नावावर इंग्लंडच्या भूमित 14 वेळेहून अधिकदा 50 हून जास्त स्कोर करण्याचा रेकॉर्ड झाला आहे. तिने
आतापर्यंत इंग्लंडमध्ये 40 वनडे सामने खेळले असून त्यात 2 शतक आणि 12 अर्धशतकं ठोकली आहेत.

3/6

Rohit Sharma england

मितालीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे रोहित शर्मा (Rohit Sharma). रोहितने इंग्लंडमध्ये केवळ 24 सामन्यांत 13 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात
7 शतकांसह 6 अर्धशतकांचा समावेश आहे. 7 शतकातील 5 शतक ही 2019 च्या विश्वचषकात रोहितने ठोकली आहेत.

4/6

Rahul dravid

तिसऱ्या स्थानावर दिग्गज फलंदाज राहुल द्रविड़चा (Rahul Dravid) नंबर लागतो. त्याने 13 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात 2 शतकांचा आणि 11 अर्धशतकांचा समावेश होतो.

5/6

Virat k-

यानंतर नंबर लागतो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा. कोहलीने इंग्लंडमध्ये 31 सामन्यांत 13 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
ज्यात केवळ 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

6/6

Shikhar Dhawan

टीम इंडिया के धाकड़ ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) भी इस लिस्ट में हैं. कोहलीनंतर अखेरचा नंबर लागतो सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याचा. धवनने इंग्लंडने 19 वनडे सामन्यांत 8 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
ज्यात 4 शतकांसह 4 अर्धशतक सामिल आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here