Home क्रीडा Photo : भारतीय संघ मैदानात, श्रीलंकेच्या भूमित सराव सामन्यात खेळाडू आपआपसांत भिडले, बीसीसीआयने शेअर केले फोटो | Indian Players on Sri lanka Tour Played Intra squad game in Colombo BCCI Shares Photo

Photo : भारतीय संघ मैदानात, श्रीलंकेच्या भूमित सराव सामन्यात खेळाडू आपआपसांत भिडले, बीसीसीआयने शेअर केले फोटो | Indian Players on Sri lanka Tour Played Intra squad game in Colombo BCCI Shares Photo

0
Photo : भारतीय संघ मैदानात, श्रीलंकेच्या भूमित सराव सामन्यात खेळाडू आपआपसांत भिडले, बीसीसीआयने शेअर केले फोटो | Indian Players on Sri lanka Tour Played Intra squad game in Colombo BCCI Shares Photo

[ad_1]


एकीकडे भारताचे वरीष्ठ क्रिकेटपटू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाल्यानंतर इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळण्याची वाट पाहत आहे. तर इकडे तरुण दमाचे युवा भारतीय क्रिकेटपटू असणारी भारतीय टीम श्रीलंका संघाला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेत पोहोचली आहे.

1/5

Shikhar Dhawanb playing

कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंची फौज श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल. दरम्यान सामन्यांआधी सराव म्हणून भारतीय खेळाडू आपआपसांत मिळून सराव सामना खेळत आहेत. या सामन्याचे काही फोटो बीसीसीआयने त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहेत. वरील फोटोत कर्णधार शिखर फलंदाजी करताना दिसत आहे.

2/5

Bhuvi bowling

या दौऱ्यात कर्णधार शिखर धवन असून उपकर्णधार पदाची जबाबदारी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्यावर सोपवली आहे. वरील फोटो भुवी गोलंदाजी करत असून नॉन स्ट्रायकर एऩ्डवर मनिष पांडे दिसत आहे.

3/5

Ruturaj G

श्रीलंका दौऱ्यात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्य़ात आली आहे. तसेच टी-20 विश्वचषक जवळ आला असल्याने कोणत्या नव्या खेळाडूंना विश्वचषकात संधी द्यायची हे ठरवण्यासाठी बीसीसीआयचे निवडकर्ते भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला हे दोघेही संघासोबत दौऱ्यावर जाणार आहेत. वरील फोटोत यष्टीरक्षक इशान किशन (Ishan Kishan) फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikawad) हे दोघे असून
टी-20 विश्वचषकाच्या संघात सलामीवीर म्हणून या दोघांमध्ये काटेंकी टक्कर आहे.

4/5

Manish Pandey and ishan

बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोना ‘High Energy, Full Intensity’ असे दमदार कॅप्शन देखील दिले आहे.

5/5

Hardik pandya Sri lanka

भारताला WTC Final मध्ये पराभवानंतर अनेकांनी एका वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची गरज असल्याचं सांगितलं. दरम्यान ही गरज पूर्ण करु शकणारा खेळाडू म्हणजे हार्दीक पांड्या (Hardik Pandya). श्रीलंका दौऱ्यात सर्वाधिक लक्ष हार्दीकवर असणार असून त्याची कामगिरी विश्वचषकाच्य संघात त्याची जागा निश्चित करेल.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here