Home क्रीडा Tokyo Olympics 2020 या महान स्पर्धेसाठी भारतीय एथलेटिक्स महासंघाने जाहिर केला संघ, ‘या’ दिग्गज खेळाडूंवर सर्वांची नजर | For Tokyo Olympics Athletcis Federation of India Announced the Squad All eyes on Dutee Chand and Neeraj Chopra

Tokyo Olympics 2020 या महान स्पर्धेसाठी भारतीय एथलेटिक्स महासंघाने जाहिर केला संघ, ‘या’ दिग्गज खेळाडूंवर सर्वांची नजर | For Tokyo Olympics Athletcis Federation of India Announced the Squad All eyes on Dutee Chand and Neeraj Chopra

0

[ad_1]


जगातील सर्वात मानाची स्पर्धा असणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी भारताचे दिग्गज खेळाडू सज्ज झाले आहेत. जपानच्या टोक्योमध्ये 23 जुलै पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारतही आपल्या दिग्गज खेळाडूंसोबत उतरणार आहे.

Tokyo Olympics 2020 या महान स्पर्धेसाठी भारतीय एथलेटिक्स महासंघाने जाहिर केला संघ, 'या' दिग्गज खेळाडूंवर सर्वांची नजर

Tokyo Olympics

 मुंबई : मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आलेली टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympic) यंदा घेण्यात येणार आहे. 23 जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून जपान सरकार, आयोजन समितीसह आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती या स्पर्धेची संपूर्ण तयारी करत आहे. जगभरातील सर्व देश आपले अव्वल दर्जाचे खेळाडू या स्पर्धेसाठी पाठवणार आहेत. दरम्यान भारतीय एथलेटिक्स महासंघाने (AFI) देखील आपल्या धुरंदर खेळाडूंचा संघ सोमवारी जाहीर केला. AFI ने या महान स्पर्धेसाठी 26 सदस्यीय संघ निवडला आहे. काहीनीं पात्रता फेरीत पास होत तर काहींनी रँकिगच्या जोरावर ऑलम्पिकमध्ये स्थान मिळवले आहे. या संपूर्ण संघात  दिग्गज धावपटू दुती चंद (Dutee Chand) आणि पुरुष भाला फेक खेळाडू नीरज चोप्रावर (Neeraj Chopra) एथलेटिक्स प्रकारात भारताच्या सर्वाधिक आशा असतील. (For Tokyo Olympics Athletcis Federation of India Announced the Squad All eyes on Dutee Chand and Neeraj Chopra)

धावपटू दुती (महिला 100 आणि 200 मीटर), एमपी जाबिर (पुरुष 400 मीटर हर्डल), गुरप्रीत सिंग आणि अनु रानी (महिला भालाफेक) यांना रँकिंगच्या आधारावर टोक्यो ऑलम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे. भारताच्या 26 सदस्यीय टीममध्ये 16 एथलीट व्यक्तिगत स्पर्धेत भाग घेतील आणि चार गुणा 400 मीटर रिले स्पर्धेत 5 पुरुष धावपटू, मिश्रित चार गुणा 400 मीटर रिलेमध्ये दोन पुरुष आणि तीन महिला धावपटू टीम्समध्ये सामिल होतील. मिश्रित चार गुणा 400 मीटरमध्ये भाग घेणाऱ्या तीन महिला धावपटूंची निवड महासंघाने रविवार झालेल्या ट्रायलच्या आधारावर केली. ऑलम्पिकमध्ये एथलेटिक्स स्पर्धा 30 जुलैला सुरु होतील.

अध्यक्षांना चांगल्या प्रदर्शनाची आशा

एएफआयीचे अध्यक्ष आदिले सुमरिवाला हे संघ निवडीनंतर म्हणाले,‘‘आम्हाला आनंद आहे की ऑलम्पिकमध्ये पाठवणाऱ्या संघात तगडे खेळाडू आहेत. शारीरिक आणि भावनात्मक रूपाने सर्व खेळाडू तयार आहेत. मागील काही  काळापासून संपूर्ण जगाला सामना करावा लागणाऱ्या कोरोनाच्या संकटात खेळाडूंना फिटनेस राखणे अत्यंत अवघड झाले आहे. पण मागील काही काळापासून सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत.’’

असा आहे संघ

पुरुष: अविनाश साबळे (3000 मीटर स्टीपलचेज, एमपी जाबिर (400 मीटर हर्डल), एम श्रीशंकर (लांब उडी), तेजिंदरपाल सिंग तूर (गोळाफेक), नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंह (भाला फेक), केटी इरफान, संदीप कुमार आणि राहुल रोहिल्ला (20 किमी पायी चाल),  गुरप्रीत सिंग (50 किमी पायी चाल), अमोज जॅकब, अरोकिया राजीव, मोहम्मद अनस, नागनाथन पंडी, नोह निर्मल टॉम (चार गुणा 400 मीटर पुरुष रिले), सार्थक भांबरी आणि एलेक्स एंटोनी (चार गुणा 400 मीटर मिश्रित रिले).

महिला: दुती चंद (100 आणि 200 मीटर), कमलप्रीत कौर आणि सीमा अंतिल पूनिया (चक्काफेक), अनु रानी (भालाफेक), भावना जाट आणि प्रियंका गोस्वामी (20 किमी पायी चाल), रेवती वीरामनी, सुभा वेंकटेशन आणि धनलक्ष्मी शेखर (चार गुणा 400 मीटर मिश्रित रिले)

हे ही वाचा :

Tokyo Olympics मध्ये ‘या’ दोघा खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची माहिती

Tokyo Olympics वर कोरोनाचे सावट कायम, सर्बियाचा कोरोनाबाधित खेळाडू जपानमध्ये, विमानतळावरुनच थेट विलगीकरणात

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

(For Tokyo Olympics Athletcis Federation of India Announced the Squad All eyes on Dutee Chand and Neeraj Chopra)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here