Home क्रीडा Video : विराट कोहलीचं Bat Balance Challenge सुरेश रैनाने स्वीकारलं, पाहा पुढे काय झालं… | Suresh Raina Accepted And Completed Virat kohli Anushka Sharma bat balance Challenge

Video : विराट कोहलीचं Bat Balance Challenge सुरेश रैनाने स्वीकारलं, पाहा पुढे काय झालं… | Suresh Raina Accepted And Completed Virat kohli Anushka Sharma bat balance Challenge

0

[ad_1]


विराटची पत्नी अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम वरून विराट कोहली सोबत एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ होता, बॅट बॅलन्स चॅलेंजचा…. (Suresh Raina Accepted And Completed Virat kohli Anushka Sharma bat balance Challenge )

Video : विराट कोहलीचं Bat Balance Challenge सुरेश रैनाने स्वीकारलं, पाहा पुढे काय झालं...

विराट कोहली आणि सुरेश रैना

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोशल मीडियावर खूपच एक्टिव असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक प्रसंग, धमाल किस्से ते अनेक वेळा सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येतात. त्यांच्या फॅन्सबरोबर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतात. काल विराटची पत्नी अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम वरून विराट कोहली सोबत एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ होता, बॅट बॅलन्स चॅलेंजचा…. (Suresh Raina Accepted And Completed Virat kohli Anushka Sharma bat balance Challenge)

विराट-अनुष्काचं चॅलेंज रैनाने स्वीकारलं

बॅट बॅलन्स चॅलेंज म्हणजे आपल्या हाताच्या बोटावर बॅटचा बॅलन्स साधायचा… असं एकंदरित विराट-अनुष्काचं चॅलेंज होतं… विराट आणि अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत होता सहाजिकच हे चॅलेंज भारतीय संघातील खेळाडू स्वीकारणं हे ठरलेलं होतं… मिस्टर आयपीएल किंग अशी ओळख असलेला सुरेश रैनाने विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं आणि ते पूर्णही केलं…

चॅलेंज एकदम टकाटक

सुरेश रैनाने आपल्या उजव्या हाताच्या बोटांवर बॅटचा बॅलन्स उत्तमरित्या सांभाळला आणि विराट अनुष्काचं बॅट बॅलन्स चॅलेंज पूर्ण केलं… विराट आणि अनुष्काचं हे चॅलेंज एकदम टकाटक आहे, असं चॅलेंज पूर्ण केल्यानंतर व्हिडिओ पोस्ट करताना सुरेश रैना यांनी म्हटलं.

सुरेश रैना देखील सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असतो. आपल्या आयुष्याशी संबंधित किस्से आणि प्रसंग तसेच पत्नी प्रियांका बरोबरचे फोटो तो त्याच्या इंस्टाग्रामवरुन शेअर करत असतो… सुरेश रैनाचे इंस्टाग्रामवर जवळपास 16 लाख मिलियन फॉलोवर्स आहेत..

विराट-अनुष्का इंग्लंडमध्ये

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला आठ विकेट्सने पराभूत करुन भारताला मोठा धक्का दिला. या धक्क्यातून आता भारतीय संघ सावरला आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासारखीच इंग्लंडविरुद्ध देखील दिमाखदार कामगिरी करुन दाखवण्याची भारताला संधी आहे. त्या दृष्टीने विराट कोहलीची टीम प्रयत्न करतीय.

(Suresh Raina Accepted And Completed Virat kohli Anushka Sharma bat balance Challenge)

हे ही वाचा :

भारत विरुद्ध श्रीलंका सामने सुरु होण्याआधीच ‘या’ खेळाडूचे निलंबन, लाखो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई

Photo : भारतीय संघ मैदानात, श्रीलंकेच्या भूमित सराव सामन्यात खेळाडू आपआपसांत भिडले, बीसीसीआयने शेअर केले फोटो



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here