Srinagar : काश्मीरमध्ये CRPF च्या जवानांवर दहशतवादी हल्ला, तीन नागरिक जखमी

0
32

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील लाल चौकापासून एक किलोमीटर दूर असलेल्या  दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या एका बंकरवर ग्रेनेडमो हल्ला केला. यात सीआरपीएफचे  जवानांना कोणतीही इजा झाली नाही मात्र तीन स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.

दहशतवाद्यांच्या हल्लानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर घेरला आहे आणि दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे.  परंतु अद्याप हल्ला कोणी केला याची माहिती मिळाली नाही. जखमी झालेल्या जवानांवर उपचार करण्यात येत आहे. जखमी झालेल्या नागरिकांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

गेल्या  काही दिवसांपासून श्रीनगरजवळ आतंकवादी हल्ल्याच्या घटना वाढत आहे. काही दिवसापूर्वीच दोन पोलिसांची हत्या करण्यात आली होती. हा हल्ला लाल चौकापासून केवळ एक किलोमीटर दूरवर झाला आहे, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या परिसरात विकेंड लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळेच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली आहे.

Source link