आईचे दुखः ह्रुदयात ठेऊन समाजरुपी आईसाठी लढणारा नेता म्हणजे सुरेशभाऊ कांबळे !!!

0
1116

संपादक : सोमनाथ देवकाते | शासननामा न्यूज ऑनलाईन

स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजाचा वापर करणारे अनेक नेते महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले पण समाजाच्या न्याय मागणीसाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी न्याय संघर्षासाठी तयार असणारे आणि जन्मदाती आई स्वर्गवासी झाली असतानाही समाजाच्या न्याय मागणीसाठी रणांगणात उतरणारा नेता म्हणजे सुरेशभाऊ कांबळे.

भाजप सरकारने पहिल्या कॅबिनेटची आरक्षण अमलबजावणीचे वचन पाळले नाही म्हणुन गेली पाच सहा वर्ष सुरेशभाऊ कांबळे यांनी सतत संघर्ष केला अरेवाडी ते चौंडी अशी ४८ दिवसांची समाजजागृती संघर्षयात्रा भर रणरणत्या उन्हात काढली यातून पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा,खानदेश अशा विविध भागांतून समाजजागृती केली,आझाद मैदानावर मोर्चा काढला,नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला ,महाराष्ट्रात चांद्या पासुन बांद्या पर्यंत महाराष्ट्राचा दौरा केला, औरंगाबादचा विभागीय मोर्चा असो की तुळजापुर ते चौंडी पदयात्रा असेल कोणत्याही परिस्थितीत आपल्या न्याय मागणी पासुन कधीही सुरेशभाऊ मागे हटले नाहीत, विधानसभेतून समाजाला जसे हवे तसे लेखी म्हणने सरकारकडून तत्कालीन विधानसभा गटनेते सुनील प्रभू यांच्या माध्यमातून घेतले न्यायालयीन लढ्यासाठी सहकार्य केले , त्याच बरोबर वर्षा निवास असेल की मातोश्री निवास येथे समाजाचा प्रश्नावर म्हणने मांडले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भाऊंच्या घरातील व्यक्तीची निवड होणार होती पण अट होती आरक्षण विषय घ्यायचा नाही पण अशा लाल दिव्याच्या अमिषालही भाऊंनी लाथ मारली आणि आपला संघर्ष चालूच ठेवला ,२०१९ ला आ.नारायण आबा पाटलांचे विधानसभेचे तिकीट शिवसेना नेत्यांन कट केले त्याचवेळी भाऊंनी विरोधात दंड थोपटुन उभे राहीले त्यावेळी नेत्याने भाऊंना निरोप पाठविला तुम्हाला विधान परीषदेवर घेऊन आमदार करतो निवडणुकिच्या रिंगणातुन माघार घ्या त्यावेळी भाऊंनी ठणकावून सांगितले मला काही नको फक्त नारायण पाटलांचे तिकिट दया समाजासाठी आमदारकीचा त्याग करणारा माणुस मी सुरेशभाऊं कांबळेच्या रुपातुन पहिल्यांदा पाहिला मनात आणले असते तर सत्तेच्या पंगतीला केव्हाच बसता आले असते पण समाजासाठी न्याय संघर्षाची तयारी होती.

त्यातही आपल्याच लोकांनी अडचणी निर्माण केल्या चौकशा लावल्या केसेस केल्या दंड लावले पण समाजबांधवांच्या न्याय मागणीची थोडीही दखल घेतली नाही.

समाज कारणासाठी संघर्ष केलेल्या लोकांचीच इतिहासात नोंद होते आणि सत्तेची झुल उतरली की लोक नेत्यांना विसरून जातात म्हणून समाजासाठी लढणाऱ्या समाजाच्या नेत्याला सुरेशभाऊ कांबळे यांच्या न्याय संघर्षाला लाख लाख शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here