Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रsuspension of mla: 'ओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजप आमदारांचे निलंबन' -...

suspension of mla: ‘ओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजप आमदारांचे निलंबन’ – bjp agitation for suspension of mlas in akola


हायलाइट्स:

  • ‘ओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजप आमदारांचे निलंबन’
  • आरक्षण पुन्हा मिळवून देईपर्यंत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करेल
  • भाजपचे तीव्र रस्ता रोको आंदोलन

अकोला : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन रस्ता रोको करण्यात आले आहे.

पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात नऊ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे दहन व काही ठिकाणी पुतळ्यावर शाही टाकण्यात आली आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

केवळ दुष्ट हेतूने केलेली १२ आमदारांची निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेस तोंड देण्याची हिंमत सरकारने दाखवावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.

राज्यातील वसुली सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गमावले असून हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी राज्यात संघर्ष करतच राहिल असा इशारा यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या आक्रमकपणाला तोंड देण्याची हिंमत महावसुली सरकारमध्ये नसल्यामुळेच दडपशाही करून सभागृहात ओबीसी आरक्षणाचा आवाज दाबण्याकरिता सरकारने १२ आमदारांचे केलेले निलंबन म्हणजे लोकशाहीचा खून आहे असे ते म्हणाले.
suspension of mla: 'ओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजप आमदारांचे निलंबन' - bjp agitation for suspension of mlas in akolaWeather Alert : ३ दिवसात पाऊस पुन्हा परतणार, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचा इशारा
ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नाही, तर केवळ वेळकाढूपणा करून ओबीसी समाजाची फसवणूक करावयाची आहे. त्यामुळेच, केंद्राकडे इम्पिरिकल डाटा मागण्याचा कांगावा करून विधानसभेतही फसवा ठराव करण्याचा सरकारचा डाव असून तो हाणून पाडण्यासाठी भाजपने वैधानिक मार्गाने सभागृहात आवाज उठवू नये यासाठीच हा लोकशाहीविरोधी कारवाई करण्यात आली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक माहीती तयार करावी लागेल व केवळ मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करूनच अशी माहिती तयार करता येणार आहे. हे स्पष्ट असूनही यासंदर्भात केंद्र सरकारकडे ठराव पाठवून ठाकरे सरकार केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे .

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावलेले आरक्षण पुन्हा मिळवून देईपर्यंत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते भाजपने सकाळी भारतीय जनता युवा मोर्चा ने पुतळा दहन व भास्कर जाधव यांच्या प्रतिमेवर काळी शाई फेकून निषेध व्यक्त केला. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी निवेदन रस्ता रोको आंदोलन करून लोकशाही पद्धतीने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आणि ओबीसी समाजातील आमदारांना निलंबित करून सरकारने काय साधल…? असाही सवाल करण्यात आला .suspension of mla: 'ओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजप आमदारांचे निलंबन' - bjp agitation for suspension of mlas in akolaना हॉल ना मैदान! लग्नासाठी जोडप्याने थेट बूक केलं डम्पिंग ग्राऊंड, कारणही आहे खासSource link

suspension of mla: 'ओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजप आमदारांचे निलंबन' - bjp agitation for suspension of mlas in akola
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News