Tuesday, June 22, 2021
Homeमनोरंजनब्युटी वर्ल्ड गाजवणा-या महिलेने इतरांंच्या सुंदरतेसाठी स्वत:चं सौंदर्य लावलं पणाला, हे घरगुती...

ब्युटी वर्ल्ड गाजवणा-या महिलेने इतरांंच्या सुंदरतेसाठी स्वत:चं सौंदर्य लावलं पणाला, हे घरगुती उपाय सुचवले!

शहनाज हुसैन (shahnaz hussain) हे नाव ठावूक नाही अशी तरुणी सापडणे कठीणच, ब्युटी क्षेत्रामधील सर्वात प्रसिद्ध असलेले हे नाव एक्स्पर्ट म्हणून ओळखले जाते. शहनाज हुसैनच्या ब्युटी टिप्स मिळवण्यासाठी तरुणी नेहमीच उत्सुक असतात, कारण त्यांच्या या टिप्स नेहमीच काम करतात आणि आजवर अनेक तरुणींना त्या टिप्सचा फायदा देखील झाला आहे. खासकरून केसांच्या समस्ये बाबतीत अनेक तरुणींना शहनाज हुसैन यांच्या टिप्स आणि उपायांचा लाभ मिळाला आहे.

आज सुद्धा आम्ही या लेखातून तुम्हाला शहनाज हुसैन यांच्या अशाच काही प्रभावी टिप्स सांगणार आहोत, ज्या केसांच्या समस्येवर तुम्हाला उपयोगी ठरू शकतात. यामुळे केस गळण्याची समस्या बंद होऊन तुमचे केस मोठे, लांब आणि घनदाट होतील. याकरता तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टची गरज नाही. शहनाज हुसैन यांनी घरच्या घरी करता येईल असा एक उपाय सांगितला आहे. जो केसांवर एखाद्या जादूसारखा काम करेल. घरबसल्या ब्युटी वर्ल्डमधील नामांकित व्यक्तीचा सल्ला मिळणं म्हणजे आपलं भाग्यच म्हणावं लागेल.

केसांना निरोगी राखण्यासाठी

ब्युटी वर्ल्ड गाजवणा-या महिलेने इतरांंच्या सुंदरतेसाठी स्वत:चं सौंदर्य लावलं पणाला, हे घरगुती उपाय सुचवले!

केसांची चमक आणि त्यांचे आरोग्य नीट राहावे यासाठी तुम्ही नारळ तेलाचा आवर्जून वापर केला पाहिजे. शहनाज हुसैन हे नारळ तेल केसाने योग्य प्रकारे कसे लावावे हे उलगडताना म्हणतात की, “सर्वात आधी नारळ तेल कोमट करावे, आता या तेलाने हळूहळू डोक्याला मालिश करावी. केसांच्या मुळांपासून वरपर्यंत हे तेल अगदी चांगल्या पद्धतीने लावावे आणि जास्त दाब देऊन मालिश करू नये. केसांना एक तास तेल लावून ठेवल्यानंतर शॅम्पू करावा.

(वाचा :- स्त्रियांनो बेफिकीर राहू नका, ‘या’ गोष्टींचं सेवन न केल्यास बाळाचा शारिरीक विकास येऊ शकतो धोक्यात)

कोकोनट मिल्क आणि साधे पाणी

ब्युटी वर्ल्ड गाजवणा-या महिलेने इतरांंच्या सुंदरतेसाठी स्वत:चं सौंदर्य लावलं पणाला, हे घरगुती उपाय सुचवले!

शहनाज यांच्या सल्ल्यानुसार, कोकोनट मिल्क अर्थात नारळ दूध घेऊन त्यात काही थेंब पाणी मिक्स करावे. आता हे मिक्स्चर आपल्या केसांमध्ये लावावे, खास करून त्या भागी लावावे जेथे केस वेगाने कमी होत आहेत आणि गळत आहेत. आता हे मिश्रण रात्रभर केसांना असेच लावून ठेवावे आणि मग दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. यामुळे तुमच्या डोक्यावर नवीन केस उगायला देखील सुरुवात होईल आणि तुमच्या केसांची कंडीशनिंग देखील होईल.

(वाचा :- लठ्ठपणावर रामबाण ‘या’ थंडगार पदार्थाचा सरबत,आयुर्वेदिक डॉक्टरांनी रेसिपी व सेवनाची पद्धत सांगितली!)

असे काम करते कोकोनट मिल्क

ब्युटी वर्ल्ड गाजवणा-या महिलेने इतरांंच्या सुंदरतेसाठी स्वत:चं सौंदर्य लावलं पणाला, हे घरगुती उपाय सुचवले!

शहनाज सांगतात की, कोकोनट मिल्क मध्ये आवश्यक असले फॅट्स, मिनरल्स आणि प्रोटीन्स आढळतात. हेच कारण आहे की कोकोनट मिल्क लावल्याने त्वरित परिणाम दिसून तुमचे केस गळणे कमी होते आणि नवीन केस उगवायला मदत मिळते. कोकोनट मिल्क मध्ये पोटॅशियम आणि लोह सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे हेअर डॅमेज, हेअर ब्रेकेज आणि हेअर फॉल कंट्रोल होतो. म्हणून तुम्ही तुमच्या केसांच्या उत्तम आरोग्यासाठी कोकोनट मिल्क किंवा कोकोनट ऑईल दोन्हींचा वापर करू शकता.

(वाचा :-मलायकाची पार्टी पण हॉट लुकमुळे गौरी खान व करीना कपूर जोमात, बाकी सगळे कोमात)

लसूण देखील देते लाभ

ब्युटी वर्ल्ड गाजवणा-या महिलेने इतरांंच्या सुंदरतेसाठी स्वत:चं सौंदर्य लावलं पणाला, हे घरगुती उपाय सुचवले!

शहनाज हुसैन यांच्या टिप्सनुसार, लसणाच्या काही पाकळ्या घेऊन त्या वाटून घ्या आणि त्यांची पेस्ट कोकोनट मिल्क मध्ये मिसळून हे मिश्रण हलके गरम करा. जेव्हा हे तेल थंड होईल तेव्हा केसांच्या मुळांमध्ये या तेलाने मालिश करा आणि 30 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर शॅम्पू करून घ्या. लसणामध्ये सल्फरची मात्रा खूप जास्त असते. यामुळे केस पुन्हा उगवण्यास मदत मिळते. हेच कारण आहे की पूर्वी देखील हेअर रीग्रोथ मेडिसिन मध्ये लसणाचा खूप उपयोग व्हायचा.

कांद्याचा रस

ब्युटी वर्ल्ड गाजवणा-या महिलेने इतरांंच्या सुंदरतेसाठी स्वत:चं सौंदर्य लावलं पणाला, हे घरगुती उपाय सुचवले!

शहनाज म्हणतात की, कांद्याचा रस योग्यप्रकारे केसांना लावल्यास देखील त्याचे मोठे लाभ केसांना मिळतात. तुम्ही 1 कांदा कापून मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि तो गाळून त्याचा रस बाजूला काढा. आता हे मिश्रण 15-20 मिनिटे केसांना लावून ठेवा आणि मग माईल्ड शॅम्पू करा. चांगले परिणाम दिसावेत यासाठी आठवड्यातून दोन वेळा कांद्याचा रस केसांना लावा. कांद्यामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात असते आणि यामुळे केस गळण्याची समस्या नक्की कमी होते. पाहिलंत न मंडळी? तुमचे केस चांगले आणि उत्तम राहावेत म्हणून तुम्हाला महागड्या ट्रिटमेंट करण्याची गरज नाही. थोडी मेहनत आणि संयम यांच्या सहाय्याने तुम्ही घराच्या घरी उपचार करून आपल्या केसांचे सौंदर्य परत मिळवू शकता.

प्रत्येकाला माहित असावी अशी गोष्ट

ब्युटी वर्ल्ड गाजवणा-या महिलेने इतरांंच्या सुंदरतेसाठी स्वत:चं सौंदर्य लावलं पणाला, हे घरगुती उपाय सुचवले!

स्वतःवर वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट्स ट्राय केल्यामुळे शहनाझ हुसैन यांना सुरुवातीला त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले पण तरीही त्यांनी हार मानली नाही आणि आज शहनाज हुसैन यांच्याच नाण्याची सौंदर्याच्या दुनियेत चलती आहे. कोणत्याही ब्यूटी प्रॉडक्टसह शहनाज हुसैन यांचे नाव जोडलेले असणे विश्वासाचे लक्षण मानले जाते.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW